एमएस धोनी आणि साक्षी धोनी मित्रपरिवारासह (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीगचा 2020 सत्र संपुष्टात आले आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला असून यंदा 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या पत्नी साक्षी (Sakshi) आणि कन्या झिवा (Ziva) यांच्यासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. आयपीएल (IPL) 13चा संपूर्ण हंगाम यंदा युएई येथे आयोजित करण्यात आला होता ज्यात चेन्नईस सुपर किंग्सने (Chennai Super Kings) लक्षात न राहावी अशी कामगिरी बजावली. सीएसकेने 12 गुणांची नोंद केली आणि पहिल्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरली. जैव-सुरक्षित बबलमध्ये खेळल्या गेलेल्या हंगामाच्या समारोपानंतर एमएस धोनीला (MS Dhoni) अलीकडेच दुबई (Dubai) येथे पहिले गेले जेथे तो आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा सोबत वेकेशनचा आनंद घेताना दिसला. इंस्टाग्रामवर धोनीच्या फॅन अकाउंट्सने दुबईमध्ये माजी भारतीय कर्णधाराला कुटुंब आणि मित्रांसमवेत आनंद घेत असतानाचे काही फोटो शेअर केले. (IPL 2021 Auction: ‘CSKने एमएस धोनीला रिटेन करू नये, 15 कोटींचे होईल नुकसान’, फ्रँचायझीला आकाश चोपडा यांचा सल्ला)

दरम्यान, झिवा सिंह धोनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाउंटवर देखील धोनीच्या लाडक्या लेकीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात झिवा पाम जुमेराह बीचवर मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ब्लॅक स्ट्रॅप्ड ड्रेसमध्ये धोनीची मुलगी फार गोंडस दिसत आहे. पाहा हे फोटोज आणि व्हिडिओज:

सुट्टीची वेळ

धोनी आणि फॅन

मित्र आणि कुटुंब

 

View this post on Instagram

 

A post shared by MS Dhoni FC 🔵 (@bleed.dhonism)

झिवाची मस्ती

 

View this post on Instagram

 

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni)

दरम्यान, साक्षी धोनीचा आज वाढदिवस असल्याने माही आणि कुटुंब दुबई येथे पोहचले आहेत. साक्षीच्या वाढदिवसाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by MS Dhoni FC 🔵 (@bleed.dhonism)

साक्षी धोनी

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात सातत्यपूर्ण संघांपैकी एक, सीएसकेने या वर्षापूर्वी या स्पर्धेत भाग घेतल्याच्या दहाही हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. तथापि, 2020 हंगाम याला अपवाद ठरला कारण त्यांना सुरुवातीपासूनच विजय गती शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला. धोनीचा बॅटने संघर्ष आणि इतर फलंदाजांचा खराब फॉर्म आणि गोलंदाज यामुळे सीएसके स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. नव्या सीझनपूर्वी सीएसकेला पुन्हा नव्याने संघाची पुनर्रचना करावी लागेल आणि खेळाडूंच्या लिलावासाठी जोरदार कॉल करावे लागतील, तर आयपीएल 2021 मध्ये धोनी पुन्हा संघात नेतृत्व करताना दिसेल. सीएसकेच्या हंगामाच्या अंतिम लीग सामन्यात नाणेफेक दरम्यान त्याने आयपीएलमधून निवृत्तीच्या अफवांना स्वतःच धुडकावून लावले होते.