सौरव गांगुली आणि एमएस धोनी (Photo Credits : Getty)

सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि एमएस धोनी (MS Dhoni) हे दोन्ही भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) दोन सर्वात सुशोभित कर्णधार आहेत यात शंका नाही. त्यांच्या मैदानाची वृत्ती असो वा नेतृत्व दृष्टिकोन असो, दोन्ही क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटला बळकटी देण्यास कोणतीही कसर सोडली नाही. भारताच्या दोन यशस्वी कर्णधारांव्यतिरिक्त धोनी आणि गांगुली यांच्यातील एक सामान्य बाब म्हणजे त्यांचे वाढदिवस. धोनीचा 7 जुलै तर दादा 8 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करतो. दोन्ही दिग्गजांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, स्टार स्पोर्ट्सने अलीकडेच त्यांच्या कर्णधारपदाच्या विविध पैलूंची तुलना करताना एक सर्वेक्षण केले. शेवटी धोनीने गांगुलीला कमीतकमी फरकाने पछाडले आणि भारताचा महान कर्णधार (India's Greatest Captain) ठरला. धोनीचं फलंदाजी कौशल्याने पुढे असल्याचे सिद्ध झाले. घरच्या सामन्यात कर्णधार, वनडे कर्णधारपद, विजेतेपद आणि फलंदाज म्हणून कामगिरी अशा चार प्रकारात धोनीने अधिक गुण मिळवले आणि गांगुलीला मागे टाकले. धोनी आणि गांगुलीचा कर्णधारपदाच्या अनेक निकषांवर निकाल लागल्यानंतर स्टार स्पोर्ट्सच्या Cricket Connected शोवर निकाल जाहीर झाला.('सौरव गांगुलीने भारतीय संघ घडवला, एमएस धोनीला विजयी फॉर्म्युला आयता मिळाला', 'या' माजी भारतीय कर्णधाराने मांडलं परखड मत)

गांगुलीपेक्षा अर्ध्या गुणांनी धोनी विजयी झाला. तथापि, दोन महान गटातील गुणांमध्ये फरक दशांशांवर आला. गांगुलीच्या नेतृत्वात आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम नंबर 2 वर पोहचल्यावर टीम इंडियाने नवचैतन्य अनुभवले.गांगुलीच्या नेतृत्वात 2002 मध्ये भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि 2003 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. टीम इंडियामध्ये विजयी मानसिकता आणण्याचे श्रेय ‘दादा’ला देण्यात आले. दुसरीकडे धोनी शांत आणि संयमी मैदानाच्या दृष्टीकोनासाठी परिचित होता.

परिवर्तित संघ: गांगुलीने (8.6) धोनीला पराभूत केले (7.3)

वनडे कर्णधारपद: धोनीने (8.1) गांगुलीला (6.8) पराभूत केले.

अवे कसोटी विजय: गांगुलीने (7.2) धोनीला (5.5) पराभूत केले

संघ मागे सोडले: गांगुलीने (7.8) धोनीला (7.6) पराभूत केले

कर्णधार म्हणून कामगिरी: धोनीने (8.5) गांगुलीला (7.2) पराभूत केले.

कर्णधार म्हणून फलंदाजी: धोनीने (7.8) गांगुलीला (7.4) पराभूत केले.

एकूणच प्रभाव: गांगुलीने (8.1) धोनीला (7.9) पराभूत केले.

ग्रॅम स्मिथ, कुमार संगकारा, गौतम गंभीर, इरफान पठाण आणि क्रिस श्रीकांत या माजी क्रिकेटपटूंनी भारताचा महान कर्णधार ठरवण्यासाठी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. गांगुलीने वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह हरभजन सिंह आणि झहीर खानसारखे दर्जेदार क्रिकेटपटू तयार केल्यामुळे धोनीचे काम सुकर झाले असे गंभीरचे मत होते.