धोनीकन्या झिवा (Photo Credit : Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच त्याची कन्याही झिवाचा देखील सोशल मीडियात चांगलाच बोलबाला आहे. तिचे व्हिडिओज सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असतात. धोनीची पत्नी साक्षीने झिवाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला अल्पावधीतच चार लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

या व्हिडिओ झिवा देखील फिटनेस फंटा सर्वांसमोर आला आहे. तीन वर्षांची ही चिमुकली प्लॅंक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत साक्षीने लिहिले की, झिवा माझ्यापेक्षा उत्तम प्लॅंक करते.

तुम्हीही पाहा झिवाचा हा व्हिडिओ...

झिवाच्या या व्हिडिओला चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि लाखभर लाईक्स मिळाले आहेत.