गौतम गंभीर, एमएस धोनी (Photo Credit: Facebook)

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या निवृत्तीसंदर्भात मोठे विधान केले आहे. धोनीने विश्वचषकनंतर टीम इंडियामधून विश्रांती घेतली आहे आणि निवडकर्त्यांकडून तो सतत आराम मागत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध घरच्या मालिकेसाठी धोनीने आपली अनुपस्थिती दर्शवली. यामुळेम अनेक प्रश्न उपस्थित झाले. नुकत्याच एका रिपोर्टनुसार धोनी दुखापतीमुळे संघातून विश्रांती घेण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहे. तर, तो डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध मालिकेसह पुनरागमन करेल असं म्हटले जात आहे. विश्वचषकमध्ये धोनीच्या संथ खेळीवर चाहते आणि जाणकारांकडून कसून टीका केली जात होती. शिवाय, धोनीकडे आता मॅच फिनिशिंग क्षमता राहिली नाही आणि आता निवृत्त व्हावे असे देखील म्हटले जात होते. (एमएस धोनी च्या फॅन्ससाठी निराशाजनक बातमी, इतक्या महिन्यांसाठी टीम इंडियातुन राहणार बाहेर)

धोनीच्या निवृत्तीबाबत गंभीर म्हणाला, "मी नेहमीच असे म्हटले आहे की निवृत्तीचा निर्णय हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. मला असे वाटते की निवडकर्त्यांनी धोनीशी बोलून त्यांची रणनीती काय आहे ते विचारले पाहिजे कारण जर आपण भारताकडून खेळत असाल तर आपण मालिका स्वत: नुसार निवडू शकत नाही."

याशिवाय, गंभीरने युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याच्या ढासळत्या फॉर्मबद्दल म्हटले की, कोच आणि कर्णधाराने पंतला पाठिंबा दिला पाहिजे. जर त्याच्या शॉटची निवड योग्य नसेल तर त्याच्याशी बोलून ती कशी सुधारता येईल यावर काम केले पाहिजे. गंभीरच्या मते, जर तुम्ही फक्त एका खेळाडूवर लक्ष केंद्रित केले, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एक वर्ष खेळाला आहे, तर सहज त्याला तणाव जाणवेल. इतक्या छोट्या कारकिर्दीत पंतने २ टेस्ट शतक केले आहेत. गंभीर म्हणाला की, "जर तुम्ही त्याला संघात संधी दिली तर त्याला पाठिंबा द्या आणि इतक्या लवकर त्याच्यावर टीका करणे चुकीचे आहे."