Sri Lanka Won Asia Cup 2022 (Photo Credit - Twitter)

यूएईमध्ये (UAE) आयोजित आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेच्या 15 व्या हंगामाचा रविवारी 11 सप्टेंबर रोजी रात्री समारोप झाला. अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान (SL vs PAK) यांच्यात झाला, ज्यामध्ये श्रीलंकेचा (Sri Lanka Win Asia Cup 2022) संघ विजयी झाला. हे जेतेपद पटकावल्यानंतर श्रीलंकेच्या संघाला किती बक्षीस रक्कम (Asia Cup 2022 Prize Money) मिळाली आणि उपविजेता संघ पाकिस्तानला (PAK) किती रक्कम मिळाली, हे तुम्हाला माहीत आहे का? जरी ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली गेली असली तरी ती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयोजित केली होती. या स्पर्धेपूर्वी जेतेपदाचा दावेदार मानला जात नसला तरी प्रत्यक्षात श्रीलंका या संघाने विजेतेपद पटकावले. राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेशी झुंजणाऱ्या श्रीलंकेला आनंद देण्याचे काम देशाच्या संघाने केले. याशिवाय संघाला भरघोस बक्षीसही मिळाले.

खरं तर, आशिया कप 2022 चा विजेता झाल्यानंतर श्रीलंकेच्या संघाला सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये मिळाले. श्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाका याला BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 1.5 लाख डॉलरचा धनादेश सुपूर्द केला. त्याच वेळी, जेतेपदाचा सामना गमावलेल्या संघाला म्हणजेच पाकिस्तानला एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) कडून बक्षीस म्हणून सुमारे 60 लाख रुपये (75 हजार डॉलर) मिळाले. (हे देखील वाचा: Asia Cup 2022 Final: अफगाणिस्तानमध्ये श्रीलंकेच्या पाकिस्तानवर विजयाचा जल्लोष, चाहत्यांनी रस्त्यावर केला जोरदार डान्स (Watch Video)

केवळ संघावरच नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेत आणि अंतिम फेरीत आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरही पैशांचा पाऊस पडला. प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणारा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याला सुमारे 12 लाख रुपयांचा ($15 हजार) धनादेश मिळाला. याशिवाय अंतिम फेरीतील सामनावीर ठरलेल्या भानुका राजपक्षेला सुमारे 4 लाख रुपये (5 हजार डॉलर) तर बेस्ट कॅच ऑफ द मॅचसाठी 3 हजार डॉलर्सचा चेक मिळाला.