आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा (SL vs PAK) 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. श्रीलंकेच्या या विजयाने देशवासियांना संकटकाळात आनंदाची संधी दिली आहे कारण हा देश सध्या भयानक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेच्या या विजेतेपदाने केवळ त्याच्या देशातील जनताच खूश नाही तर अफगाणिस्तानातील जनताही खूश आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, अफगाणिस्तानातील (AFG) जनता श्रीलंकेच्या विजयापेक्षा पाकिस्तानच्या पराभवाने अधिक आनंदी असल्याचे दिसते. आशिया कप 2022 च्या फायनलनंतर अफगाणिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानवर श्रीलंकेचा विजय साजरा केला. अफगाणिस्तानचे चाहते मॅच संपल्यानंतर रस्त्यावर आले आणि जोरदार नाचले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)