मोहम्मद सिराज वर्णद्वेषी टिप्पणी (Photo Credit: PTI)

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Vs India) असून यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या (Brisbane) मैदानावर खेळला जात आहे. मालिकेचा निकाल निश्चित करणारा हा कसोटी सामना आहे. मात्र, या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवाग गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) वर्णद्वेषीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी सिडनीच्या मैदानावर मद्याच्या अमलाखाली असलेल्या काही समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली होती. याप्रकरणी सर्वच स्तरातून टीका होत असताना आता चौथ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी मोहम्मद सिराजवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.

या प्रकाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मोहम्मद सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना काही ऑस्ट्रेलियन चाहते त्याला शिवीगाळ करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मोहम्मद सिराज बरोबर वॉशिंग्टन सुंदरचीही काही प्रेक्षकांनी खिल्ली उडवली. त्याला त्रास दिला, असे ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्मध्ये म्हटले आहे. हे देखील वाचा- Navdeep Saini Injury Update: क्रिकेटर नवदीप सैनीच्या दुखापतीवर बीसीसीआयने दिला अपडेट, गब्बा टेस्टमध्ये मधेच सोडावं लागलं मैदान

ट्वीट-

भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5 बाद 274 धावा केल्या आहेत.

यापूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 13 वर्षापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत वर्णद्वेषी शेरेबाजीवरुन मोठा वाद झाला होता. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अँड्रयू सायमंडसला माकड म्हटल्याचा त्याने आरोप केला होता. या आरोपाचे मैदानावर आणि मैदानाबाहेरही पडसाद उमटले. दोन्ही संघांमधील मैत्रीपूर्ण वातावरण बिघडले होते. दोन्ही देशाची क्रिकेट मंडळ, खेळाडू, माजी खेळाडू, मीडिया आणि दोन्ही देशाची सरकारे या वादामध्ये सहभागी झाली होती.