Rohit Sharma on Mohammed Shami: भारतीय संघाची मायदेशात न्यूझीलंड संघाविरूद्ध कसोटी मालिका सुरू झाली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे होणार होता. मात्र, पावसामुळे तो रद्द झाला. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने() पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे देताना. भारत-न्यूझीलंड या मालिकेबद्दल बोलताना रोहित शर्माने मोहम्मद शमीबाबत (Mohammed Shami) मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माने केलेल्या एका वक्तव्यामुळे भारतीय संघासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. मोहम्मद शमी अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. तो आता सुरू होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेचा भाग तर नाही, पण पुढील मालिकेत खेळू शकेल की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे.
रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला?
मोहम्मद शमीबद्दल बोलताना रोहित शर्माने सांगितलं, ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शमीबाबत निर्णय घेणं खूप अवघड आहे. त्याच्या गुडघ्याला पुन्हा सूज आली आहे. आता त्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. शमी एनसीएमध्ये डॉक्टर आणि फिजिओच्या देखरेखीखाली आहे. दुखापत असलेल्या शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ शकत नाही. तो लवकर दुखापतीतून सावरेल अशी आशा आहे. मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दल अलीकडे आलेला रिपोर्ट काही प्रमाणात खरा असल्याचे रोहित शर्माच्या या विधानावरून खरा होता, अशीही चर्चा आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका पाच सामन्यांची असणार आहे. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये कोणते संघ अंतिम फेरीत खेळतील हे या मालिकेतून निश्चित होण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण एखाद्या सामन्याच्या निकालानेही पूर्ण गुणतालिकेत बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
शमीला पुन्हा दुखापत झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली तेव्हा शमीने स्वत: स्पष्टीकरण देत लिहिले होते की, 'अशा निराधार अफवा का पसरवल्या जात आहेत? मी बरा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बीसीसीआय आणि मी बॉर्डर-गावसकर मालिकेतून बाहेर असल्याचे म्हटलेले नाही.' शमीने चाहत्यांना अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नये असेही आवाहन केले होते.