शनिवारपासुन टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुपर-12 चे सामने सुरु होणार आहे. दुसऱ्या फेरीची सुरुवात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (AUS vs NZ) यांच्यातील 22 ऑक्टोबर रोजी होणार्या पहिल्या सामन्याने होईल, तर टीम इंडिया 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. भारत-पाकिस्तानसह (IND vs PAK) जगभरातील चाहत्यांच्या नजरा या महान सामन्यावर खिळल्या आहेत. अशा परिस्थितीत माजी खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनबद्दल बरीच चर्चा करत आहेत. भारताची फलंदाजी जवळपास निश्चित झाली आहे, पण गोलंदाजी गडबडीत आहे. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत गोलंदाजी खूपच निस्तेज दिसत आहे.
भारताने T20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात भुवनेश्वर कुमारसह मोहम्मद शमी, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह यांचा समावेश आहे, तर फिरकी विभागात युझवेंद्र चहल, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.
दोन फिरकी गोलंदाजांसह तीन गोलंदाज खेळू शकतात
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत दोन डावपेचांसह गोलंदाजी आक्रमणात उतरू शकतो. एका फिरकीपटूसह तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याची पहिली रणनीती असू शकते, अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या पाचव्या गोलंदाजाची पोकळी भरून काढेल. दुसरीकडे, दुसरी रणनीती दोन फिरकी गोलंदाजांसह तीन गोलंदाज खेळवण्याची असू शकते. पण या रणनीतीमुळे भारताच्या फलंदाजीची खोली थोडी कमी होईल. (हे देखील वाचा: T20 World Cup मध्ये संपूर्ण खेळ बदलू शकतात 'हे' तीन भारतीय गोलंदाज, माहिती नसेल तर घ्या जाणून)
हर्षल पटेलला वगळण्याची शक्यता
शमी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळू शकचो, तर हर्षल पटेल बाहेर बसु शकतो. याचा अर्थ अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह यांच्यासोबत शमी वेगवान गोलंदाजीचा भाग असेल. संघात अर्शदीपमुळे भारताला डावखुरा वेगवान गोलंदाज मिळेल जो फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी अँगलचा वापर करू शकेल, तर भुवी डावाच्या सुरुवातीस आपल्या कौशल्याचा चांगला वापर करू शकेल. हर्षल पटेलचे कार्डही कापले जाऊ शकते कारण त्याच्या पुनरागमनानंतर टीम इंडियामध्ये त्याची कामगिरी काही खास राहिली नाही, तो बहुतांश सामन्यांमध्ये महागडा ठरला आहे.