MI vs SRH, IPL 2019 Live Cricket Streaming: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
MI vs SRH, IPL 2019 (Photo Credits: File Image)

आज मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) इंडियन प्रिमियर लीगच्या (Indian Premier League) 12 व्या सीजनमधील 51 वा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) या दोन संघांमध्ये हा सामना होईल. हैद्राबाद संघ  12 पॉईंट्सह चौथ्या स्थानी आहे तर मुंबई संघ 14 पॉईंट्स मिळत तिसऱ्या स्थानी आहे.

डेव्हिड वॉर्नर मायदेशी परतल्यानंतर पहिल्यांदाच त्याच्याशिवाय हैद्राबाद संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आता त्याच्याऐवजी मार्टिन गप्टिलला संघात स्थान मिळू शकतं. कोलकता विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला हार पत्कारावी लागली होती. त्यामुळे आजचा सामना जिंकून प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी मुंबई संघ नक्कीच प्रयत्न करेल.

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

मुंबई विरुद्ध हैद्राबाद हा सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई विरुद्ध हैद्राबाद नाणेफेक

 

मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD, Hotstar या चॅनलवर देखील तुम्हाला लाईव्ह सामना पाहता येईल.