MI vs SRH Head to Head: आज मुंबई इंडियन्स अन् सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार सामना, आकेडवारीत कोण वरचढ? घ्या जाणून
MI vs SRH (Photo Credit - X)

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा हैदराबादचा संघ 12 गुणांसह टॉप-4 मध्ये आहे. पण एसआरएचचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झालेले नाही आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्स संघ त्यांचा खेळ खराब करू शकतात. आज मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत मुंबईचा संघ संध्या दहाव्या क्रमांकावर आहे, तर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे.  वानखेडेचं मैदाना छोटं असल्यामुळे सहज धावा होतात. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असते. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यास कोणत्याही संघाला फायदेशीर ठरतं. ( Kolkata Knight Riders Beat Lucknow Super Giants: कोलकाता 98 धावांनी विजयी, लखनौचा दुसऱ्यांदा केला पराभव; गोलंदाजांनी केला कहर )

पाहा पोस्ट -

मुंबई इंडियन्स 11 सामन्यांत 6 गुणांसह गुणतालिकेत 10व्या स्थानावर आहे. सर्व सामने जिंकले तरी ते 12 गुणांच्या पुढे जाऊ शकणार नाही. कारण सनरायझर्ससह 5 संघांचे 12 किंवा अधिक गुण आहेत. याचा अर्थ मुंबई इंडियन्स आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे आणि हीच गोष्ट सनरायझर्ससाठी धोकादायक ठरू शकते.