LSG vs KKR IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 54 वा (IPL 2024) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) यांच्यात लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने लखनौचा 98 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. तत्पूर्वी, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 5 बाद 235 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीवीर सुनील नारायणने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. लखनौ सुपर जायंट्सकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ 16.1 षटकात केवळ 137 धावा करून अपयशी ठरला. लखनौ सुपर जायंट्सकडून स्टार फलंदाज मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 36 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)