MI vs CSK IPL 2021 Match 27: मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आयपीएलच्या (IPL) 27व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मोईन अली (Moeen Ali), फाफ डु प्लेसिस आणि अंबाती रायुडूच्या (Ambati Rayudu) धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 218 धावांचा डोंगर उभारला आहे. रायुडू सर्वाधिक 72 धावा तर जडेजा 22 धावा करून नाबाद परतले. मोईनने 58 धावांची खेळी केली तर डु प्लेसिसने 50 धावांचे योगदान दिले. मोईन आणि डु प्लेसिसच्या शतकी भागीदारीने चेन्नईच्या आव्हानात्मक धावसंख्याचा पाया रचला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचे गोलंदाज आज लयीत दिसले नाही. किरोन पोलार्डने (Kieron Pollard) 2 विकेट्स काढल्या तर ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IPL 2021: रोहित शर्माची जबरदस्त कामगिरी, CSK विरोधात मैदानात उतरताच ‘हिटमॅन’ने रचला इतिहास)
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आजच्या सामन्यात टॉस जिंकून मुंबईने चेन्नईला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. ट्रेंट बोल्टने डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये धोनीब्रिगेडला मोठा धक्का दिला. 4 धावांवर चेन्नईची पहिली विकेट पडली. बोल्टने डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये फॉर्ममध्ये असलेल्या रुतुराज गायकवाडला तंबूत पाठवले. गायकवाड 4 चेंडूत 4 धाव काढून बाद झाला. मात्र नंतर मोईन-डु प्लेसिसने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच क्लास घेतली. दोंघांनी चौकार-षटकारांची बरसात करत संघाची धावसंख्या शंभरी पार पोहचवली. यादरम्यान, मोईनने 33 चेंडूत शानदार अर्धशतक पूर्ण केलं. पण यानंतर बुमराहने मोईनला तंबूचा रस्ता दाखवला. मोईनला जसप्रीत बुमराहने विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हाती कॅच आऊट केलं.
मोईन बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिसने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकानंतर तो पोलार्डच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. डु प्लेसिसने 28 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. पोलार्डने आपल्या एकच ओव्हरमध्ये चेन्नईला दुहेरी धक्का दिला. डु प्लेसिसपाठोपाठ पुढील चेंडूवर रैनाही 2 धाव करून माघारी परतला. अखेरीस रायुडू-जडेजाच्या भागीदारीने चेन्नईने धावांचा डोंगर उभारला. रायुडूने आपल्या खेळीत 7 उत्तुंग षटकार आणि 4 चौकार खेचले.