IPL 2021: रोहित शर्माची जबरदस्त कामगिरी, CSK विरोधात मैदानात उतरताच ‘हिटमॅन’ने रचला इतिहास

शनिवारी (1 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध टॉससाठी मैदानात उतरताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला. रोहितच्या टी-20 कारकिर्दीतील हा 350 वा सामना आहे. रोहित टी -20 क्रिकेटमध्ये 350 सामने खेळणारा पहिला भारतीय तर जगातील 12वा क्रिकेटर ठरला आहे.

IPL 2021: रोहित शर्माची जबरदस्त कामगिरी, CSK विरोधात मैदानात उतरताच ‘हिटमॅन’ने रचला इतिहास
रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Twitter/@IPL)

MI vs CSK IPL 2021: शनिवारी (1 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (Chennai Super Kings) टॉससाठी मैदानात उतरताच मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने  (Rohit Sharma) इतिहास रचला. रोहितच्या टी-20 कारकिर्दीतील हा 350 वा सामना आहे. रोहित टी -20 क्रिकेटमध्ये 350 सामने खेळणारा पहिला भारतीय तर जगातील 12वा क्रिकेटर ठरला आहे. रोहितनंतर एमएस धोनीने (MS Dhoni) टी-20 मध्ये दुसरे सर्वाधिक 338 सामने खेळले आहेत. यानंतर, तिसर्‍या क्रमांकावर सुरेश रैना (331), चौथ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक (317) आणि पाचव्या क्रमांकावर विराट कोहली (311) आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 01, 2021 08:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).