MS Dhoni and Rohit Sharma. (Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13वा हंगाम अगदी उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे सर्व आयपीएल (IPL) फ्रंचायझी जोरदार तयारीला लागले आहेत. आयपीएलमधील दोन बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) पहिला सामना खेळला जाईल. अबू धाबी येथे शेख झायेद स्टेडियमवर 19 सप्टेंबर रोजी हा सामना खेळला जाईल. आयपीएलच्या नवीन हंगामाची दमदार सुरुवात करण्यासाठी एमएस धोनीचे सुपर किंग्स नक्की पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तो दमदार 11 खेळाडूंसह मैदानावर उतरेल. मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी आज आपण सीएसकेच्या संभावित अंतिम 11 खेळाडूंचा आढावा घेणार आहोत. (MI vs CSK, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असेल रोहित शर्माची पलटन)

सलामी जोडी: शेन वॉटसन (Shane Watson) आणि अंबाती रायुडू (Ambati Rayudu) पुन्हा एकदा चेन्नईकडून डावाची सुरुवात करतील. वॉटसनने पुन्हा एकदा सुपर किंग्जचा सलामी फलंदाजाच्या भूमिकेत दिसेल अशी अपेक्षा आहे. दोन-दोन वेळा सर्वाधिक मूल्यवान प्लेअर पुरस्कार विजेता असलेल्या वॉटसनचा प्रत्येक हंगामात त्याच्या टीमच्या कामगिरीवर लक्षणीय परिणाम झाला. सलामी जोडी म्हणून सीएसके फाफ डु प्लेसिस आणि रायुडूबरोबर जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात रायुडूची सीएसकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका होती. सलामी फलंदाज तसेच मधल्या फळीत तो फलंदाजी करतो, जे संघ समायोजित करण्यासाठी अतिरिक्त लवचिकपणा देते.

मध्य क्रम: फाफ डु प्लेसिस, एमएस धोनी, केदार जाधव यंदा मधल्याफळीतील  सांभाळतील. डु प्लेसिस तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल, तर धोनीएक स्थान वर फलंदाजीसाठी येऊ शकतो. गेल्या दोन मोसमात धोनीने काही शानदार खेळी खेळल्या आहेत आणि 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. केदार जाधव पाचव्या स्थानावर टीमला मजबूती देईल.

अष्टपैलू: मागील अनेक वर्षांपासून सीएसकेचा अविभाज्य भाग असलेले रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो पुन्हा एकदा टीमसाठी ऑल-राउंड भूमिकेसाठी सज्ज आहेत. जाडेजा आणि फ्रेंचायझीला पुन्हा एकदा डायनॅमिक अष्टपैलूकडून मोठी अपेक्षा असेल. दुसरीकडे, डेथ ओव्हर्स दरम्यान आयपीएलमध्ये धोनीला पुन्हा एकदा अवघड परिस्थितीत ब्रावोकडे पाहिलं. ब्रावोने गेल्या अनेक वर्षात बॅट आणि बॉलने सीएसकेसाठी मोठी भूमिका बजावली आहे.

गोलंदाज: शार्दुल ठाकूर, दीपक चाहर वेगवान गोलंदाज असतील तर पियुष चावला आणि इमरान ताहिर आपल्या फिरकीच्या जादूने टीमसाठी विकेट घेण्याचे काम करतील. शार्दूल, राष्ट्रीय संघाचा नियमित सदस्य बनला आहे आणि त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी देखील केली आहे. आणि तो दीपक चाहरसह सीएसकेच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. पीयूष चावला, स्पिनर म्हणून सीएसकेची पहिली निवड असावी यामागील कारण म्हणजे त्याचा अनुभव. गोलंदाजी म्हणून त्याच्या पराक्रमाव्यतिरिक्त तो खालच्या ऑर्डरमध्ये सुलभ फलंदाजही सिद्ध होऊ शकतो.

मुंबई इंडियन्सविरुद्ध असा असेल सीएसकेचा प्लेयिंग इलेव्हन: एमएस धोनी (कॅप्टन), शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, एमएस धोनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, पियुष चावला, इमरान ताहिर.