रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) बहुप्रतिक्षित 2020 आवृत्ती शनिवार, 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्या टक्कर पाहायला मिळेल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सने 4 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत, तर चेन्नई सुपर किंग्ज महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात तीन वेळा चॅम्पियन बनले आहेत. या महामुकाबल्याआधी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मुंबई आणि चेन्नई टीममधील स्पर्धेबाबत मोठे विधान केले. टी-20 लीगच्या यशात प्रतिस्पर्धा निर्णायक ठरते, असा सचिनचा विश्वास आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज ही नेहमीच आयपीएलमधील सर्वात तीव्र प्रतिस्पर्धी ठरली आहे आणि रोहित शर्मानेही त्याला या टी-20 लीगचा 'El-Classico' असे संबोधले. आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघांदरम्यान सामना इतका तीव्र कसा बनला आणि स्पर्धेच्या सलामीच्या लढतीतून त्याला काय अपेक्षा आहे याबद्दल सचिनने आपले मत मांडले. (MI vs CSK, IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स 'या' 11 शिलेदारांसोबत उतरू शकते मैदानात)

“कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला प्रतिस्पर्ध्यांची गरज आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोघांचेही जबरदस्त फॅनबेस आहे. दोघेही अत्यंत स्पर्धात्मक आहेत. असे काही प्रसंग घडले आहेत जेव्हा मुंबई इंडियन्सला एका कोपऱ्यात खेचले गेले होते आणि आम्ही तो सामना जिंकू शकलो आहोत आणि चेन्नई सुपर किंग्जसोबतही असे घडले आहे," मुंबई इंडियन्सने ट्विट केलेल्या व्हिडिओत सचिनने म्हटले. मध्यंतरी होणारी तीव्र स्पर्धा लोकांना बघायला आवडत असल्याने या स्पर्धेमुळे लीगला मोठ्या प्रमाणात लोकप्रियताही मिळाली आहे, असे मत सचिनने व्यक्त केले. भूतकाळाप्रमाणेच दोन्ही बाजूंनी समान तीव्रतेने खेळण्याची आणि जगाच्या निरनिराळ्या भागातील चाहत्यांचे पुन्हा एकदा मनोरंजन करतील अशी त्याची अपेक्षा आहे.

मुंबईस्थित फ्रँचायझीचा सल्लागार असलेले सचिनने संघासह युएईला गेलेला नाही. गेल्या वर्षी झालेल्या शिखर लढतीच्या पुनरावृत्तीत मुंबई इंडियन्सने अबू धाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा सामना करत मोहिमेची सुरुवात करतील. यंदा आयपीएलच्या मोहिमेमध्ये क्रिस लिन आणि नॅथन कोल्टर-नाईल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी अशीही सचिनची अपेक्षा आहे.