Advertisement
 
गुरुवार, ऑक्टोबर 02, 2025
ताज्या बातम्या
1 day ago
Live

TATA IPL 2025 Mega Auction LIVE Update: जेद्दाहमध्ये थोड्याच वेळात सुरु होणार मेगा लिलाव, 577 खेळाडूंचे भवितव्य पणाला

क्रीडा Nitin Kurhe | Nov 24, 2024 02:32 PM IST
A+
A-
24 Nov, 14:38 (IST)
चाहते आयपीएल 2025 मेगा लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema ॲपवर विनामूल्य पाहू शकतात. तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर मेगा लिलावाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
24 Nov, 15:17 (IST)
यंदाच्या आयपीएल लिलावाची प्रक्रिया भारतीय स्टार्स ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या मार्की खेळाडूंच्या पहिल्या सेटसह सुरू होईल.

TATA IPL 2025 Mega Auction LIVE:  इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव आज जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. हा लिलालव 3.30 वाजता सुरु होणार आहे. मेगा लिलावात एकूण 577 खेळाडू आपले नशीब आजमावतील, त्यापैकी 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत. या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत. असे काही भारतीय खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघ 30 कोटी रुपये देखील खर्च करू शकतात. आयपीएलच्या दहा संघांकडे 641.5 कोटी रुपये आहेत, तर पंजाब किंग्जचे सर्वाधिक बजेट 110.5 कोटी रुपये आहे.


Show Full Article Share Now