क्रिकेटचा (Cricket) खेळ काळाच्या ओघात सतत बदलत असतो. खेळ अधिक रोमांचक करण्यासाठी क्रिकेटच्या नियमांमध्ये वेळो-वेळी बदल झालेले पाहायला मिळाले आहे. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (Marylebone Cricket Club) क्रिकेटचे नियम ठरवण्यासाठी जबाबदार आहे. एमसीसीने (MCC) बुधवारी क्रिकेटमध्ये काही नवीन कायदे आणण्याचा निर्णय घेतला आहे. काही नियम जे खेळाल अधिक रोमांचक बनवतील. यावेळी मंकडींगच्या नियमातही (Mankading Rule) बदल करण्यात आला आहे. एखद्या खेळाडूला बाद करण्यासाठी क्रिकेटचा हा नियम, सतत वादात राहिला आहे आणि त्यावर सतत चर्चा होत असते. यापैकी अनेक नियमांची ECB ने ‘द हंड्रेड’ सिरीजमध्ये चाचणी केली होती. त्यामुळे एमसीसीने मंकडींगच्या कायद्यात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मँकाडिंगचा कायदा नेहमीच वादांनी वेढला गेला आहे, परंतु हा क्रिकेटचा एक भाग जो आता कायम राहील.
गेल्या काही वर्षांपासून ‘मँकाडिंग’ हा खेळ भावने संदर्भात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. तथापि, MCC ने खेळाच्या नियमांमध्ये मोठा बदल घडवून आणला असून, या नियमाला खेळाच्या ‘अनफेअर प्ले’ विभागातून ‘रन आउट’ नियमात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बाद करण्याच्या सर्वात असामान्य प्रकारांपैकी एक, मॅनकाडिंगबाबत मते खेळाडूंमध्ये मिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहींना असे वाटते की बाद करण्याचा हा प्रकार यापुढे नियमपुस्तिकेचा भाग असू नये परंतु असेही लोक आहेत ज्यांनी ते आणखी मजबूत करण्याची मागणी केली आहे. ‘अयोग्य’ विभागातून ‘रनआऊट’मध्ये शिफ्ट करण्यामागील तर्क स्पष्ट करताना निर्णयाचे स्पष्टीकरण देताना MCC कायदा व्यवस्थापक, म्हणाले, “हे एक रनआउट आहे परंतु ते नेहमीच अयोग्य खेळाच्या कायद्यात होते आणि आम्ही ‘का’ असा प्रश्न केला. हे अन्यायकारक आहे का?”
“गोलंदाजाला नेहमी खलनायक म्हटले जाते परंतु एखाद्याला बाद करण्याचा हा एक कायदेशीर मार्ग आहे आणि तो नॉन-स्ट्रायकर आहे जो मैदानात धाव चोरत आहे.” याशिवाय MCC द्वारे नियमांमध्ये काही इतर बदल देखील करण्यात आले आहेत. चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर कायमची बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन यापूर्वी हे काही काळ निलंबित करण्यात आले होते. पण आता, कायदेतज्ज्ञ याकडे ‘स्वच्छतेचा’ मुद्दा म्हणून पाहत आहेत आणि म्हणूनच खेळाडूला लाळ वापरण्यावर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हे नियम स्वीकारणे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि राष्ट्रीय क्रिकेट संघटनांवर अवलंबून आहे. सामान्यतः, MCC द्वारे केलेल्या बहुतेक बदल निषेध न करता स्वीकारले जातात.