![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/matthew-breetzke1.jpg?width=380&height=214)
New Zealand National Cricket Team vs South Africa National Cricket Team, 2nd ODI Match 2025: दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने (Matthew Breetzke) आपला पहिला एकदिवसीय सामना खेळत इतिहास रचला आहे. मॅथ्यू ब्रीट्झके हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला (Matthew Breetzke Record) आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत ब्रीट्झकेने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 150 धावा केल्या. ब्रीट्झके एकदिवसीय पदार्पणात 150 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्ध, ब्रीट्झकेने 148 चेंडूत 150 धावा केल्या, त्यात 5 षटकार आणि 11 चौकार होते. (Matthew Breetzke: मॅथ्यू ब्रीट्झके आहे तरी कोण? न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा एलएसजीचा खेळाडू)
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ब्रीट्झकेच्या खेळीच्या जोरावर 50 षटकांत 6 बाद 304 धावा केल्या. ब्रीट्झके व्यतिरिक्त, वियान मुल्डरने 60 चेंडूत 64 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यासह, मॅथ्यू ब्रीट्झके हा पुरुषांच्या एकदिवसीय पदार्पणात शतक करणारा चौथा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बनला आहे. ब्रीट्झके सध्या फक्त 26 वर्षांचा आहे आणि टी-20 व्यतिरिक्त त्याने कसोटीतही पदार्पण केले आहे.
पदार्पणाच्या सामन्यात केली ऐतिहासिक कामगिरी
Matthew Breetzke!! 🌟🔥👏 First ever player to score 150+ on ODI debut.
Phenomenal, just phenomenal 🏏💥.#WozaNawe #BePartOfIt #NZvSA pic.twitter.com/8SjcG74FvM
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 10, 2025
आयपीएलमध्ये लखनौकडून खेळणार
आयपीएलमध्ये, ब्रीट्झके लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) कडून खेळताना दिसेल. एलएसजीने त्याला लिलावात 57 लाख रुपयांना विकत घेतले.