मातृदिन 2020 निमित्त सचिन तेंडुलकर याने  शेअर केला आई सोबतचा आठवणीतला फोटो; ट्विटद्वारे व्यक्त केल्या भावना
Sachin Tendulkar Pic with Mother (Photo Credits: Twitter)

आज जागतिक मातृदिन. आईप्रती आपल्या भावना, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान अढळ असते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आईला गृहीत धरणे आपसुकच होते. मात्र आईबद्दल वाटणारं प्रेम, आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मातृदिनानिमित्त आपल्याला लाभते. ही संधी खुद्द सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)  याने देखील वाया जावू दिली नाही. आई सोबतचा आठवणीतला खास फोटो शेअर केला आहे. ट्विट करत सचिनने आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

"तू माझ्यासाठी आई आहेस. कारण सगळ्या गोष्टींच्या पलिकडे जात तू अप्रतिम आहेस. तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. तू माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद." अशा आशयाचे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.  (मातृदिना निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून व्यक्त करा आईप्रती आपल्या भावना!)

सचिन तेंडुलकर ट्विट:

मातृदिनाचे औचित्य साधत आज अनेकजण सोशल मीडियावर आई प्रती वाटणाऱ्या भावना व्यक्त करतील. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींही सहभागी होतील. आई सोबतचे फोटो/सेल्फी, आईवरील कविता, छानसा संदेश, व्हिडिओ शेअर करत अनेकजण आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देतील. मात्र केवळ भावना व्यक्त करणे, शुभेच्छा देणे इतक्या पुरता मातृदिन मर्यादित न राहता त्यापुढे जावून आईला समजून घेणे, तिची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.