ICC Test Rankings: विराट कोहली याचे अव्वल स्थान कायम, सिडनी टेस्टमध्ये द्विशतकी खेळीनंतर मार्नस लाबूशेन याचा टॉप-3 मध्ये समावेश
मार्नस लाबूशेन (Photo Credit: Getty)

आयसीसीने टेस्ट क्रिकेट फलंदाजांची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळलेला तिसरा कसोटी सामना यजमान संघाने 279 धावांनी जिंकला. यासह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात केपटाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला गेला. इंग्लंडने या सामन्यात 189 धावांनी विजय नोंदवला. या सामन्यांमध्ये बऱ्याच खेळाडूंनी फलंदाजीत उत्कृष्ट खेळ दाखविला. आयसीसीने जाहीर केलेल्यूए नवीन रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाई खेळाडूंना फायदा झाला आहे. मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) याने न्यूझीलंडविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये दुहेरी शतक केले. लाबूशेनने सिडनी कसोटीत 215 आणि 59 धावांचा डाव खेळला. या खेळीनंतर त्याने क्रमवारीत एक स्थानाचा फायदा झाला आहे आणि फलंदाजांच्या क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. लाबूशेनने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याला खाली ठाकला तिसरे स्थान मिळवले. सिडनी टेस्ट न खेळल्यामुळे विल्यमसनला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. यासह डेव्हिड वॉर्नर (David Warner) यालाही 2 स्थानांचा फायदा झाला आहे. वॉर्नरने सिडनी टेस्टच्या दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आणि आता तो पहिल्या पाच फलंदाजांमध्ये पोहचला आहे. (जेम्स अँडरसन याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टाकला असा वेगवान बॉल कि दोन तुकड्यांमध्ये तुटली बॅट, फलंदाजही झाला स्तब्ध)

भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना मात्र प्रत्येकी एक-एक स्थानचे नुकसान झाले आहे. पुजारा 5 व्या स्तनावरुन 6 व्या, तर रहाणे 8 व्या 9 व्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स फलंदाजी क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. सामन्याच्या दुसर्‍या डावात त्याच्या 47 चेंडूत 72 धावा फटकावल्या होत्या. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) यानेही एक स्थानाची आघाडी घेतली आहे. तो आता आठव्या स्थानावर पोहचला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या स्थानावर आहे. त्याच्याकडे सध्या 928 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथचे 911 गन असून ते दुसर्‍या स्थानावर आहेत. पाकिस्तानचा बाबर आजम 7 व्या स्थानावर गेला आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत मिशेल स्टार्क (Mitchell Starc) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) यांना फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स याने अव्वल स्थान कायम ठेवले, तर स्टार्कने पहिल्या 5 तर अँडरसनने टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. भारतीय जसप्रीत बुमराह 6, रविचंद्रन अश्विन 9 व्या आणि मोहम्मद शमी 10 स्थानी घसरले आहे. कगिसो रबाडा इंग्लंडविरुद्ध प्रभावी कामगिरी करण्यास अपयशी ठरल्याने त्याला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो चौथ्या स्थानी घसरला असून जेसन होल्डर तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.