जेम्स अँडरसन आणि केशव महाराज 

इंग्लंडचा (England) अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने दुखापतीनंतर मैदानात पुनरागमन केले आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत तो पूर्ण लयीत दिसत आहे. मंगळवारी केपटाऊन कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी 37 वर्षीय अँडरसनने असा वेगवान बॉल टाकला कि फलंदाजी करणाऱ्या केशव महाराज (Keshav Maharaj) याची बॅटच तुटली. इंग्लंडने केपटाऊन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 438 धावांचे आव्हान ठेवले. चौथ्या दिवशी यजमान संघाच्या पीटर मालन (Peter Malan) याने शानदार अर्धशतक झळकावत संघाला सामन्यात कायम ठेवले. अर्धशतक झळकावत मालनने चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला 2 गडी गमावून 126 धावांवर वर नेले. मॅचच्या पाचव्या दिवशी अँडरसनने इंग्लंडसाठी गोलंदाजीची सुरुवात केली. दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अँडरसनने असा चेंडू टाकला ज्याने आफ्रिकेच्या केशव महाराजाला स्तब्ध केले. (SA vs ENG: बेन स्टोक्स याने नोंदवला कॅचचा नवीन विश्वविक्रम, 142 वर्षानंतर पहिल्यांदा इंग्लंडसाठी केला असा रेकॉर्ड)

महाराजने अँडरसनच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण बॉलच्या वेगाने त्याच्या बॅटचे हँडलच तुटले. अँडरसनच्या चेंडूवर त्याची बॅट तुटताच मैदानावरील प्रत्येकजण त्याच्याकडे पाहू लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात, 10 व्या ओव्हरमधीलअँडरसनच्यापाचव्या चेंडूवर महाराजची बॅट तुटली.

केशव महाराजची बॅट

दरम्यान, अँडरसनबद्दल बोलायचे झाले तर 37 इंग्लिश गोलंदाज एक उत्तम लयीत दिसत आहे. त्याने सेंच्युरियनमधील मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 5 विकेट घेण्याचे आश्चर्यकारक कामगिरी केली. अँडरसनने 19 ओव्हरमध्ये 40 धावा देऊन 5 गडी बाद केले होते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट्स गमावले आणि विजयासाठी 200 हून अधिक धावांची गरज आहे. इंग्लंडने जर आज आफ्रिकेला बाद केले तर ते मालिकेत बरोबरी साधतील. पीटर मालन सध्या संघासाठी प्रभावी फलंदाजी करत आहे. मालन आणि रस्सी व्हॅन डर ड्यूसेन (Rassie van der Dussen) साध्य खेळपट्टीवर फलंदाजी करत आहे, शिवाय मालन त्याच्या शतकाच्याही जवळ पोहचला आहे.