Photo Credit- X

Malaysia National Cricket Team vs Hong Kong National Cricket Team 6th T20I 2025 Scorecard: मलेशिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि हाँगकाँग महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (Malaysia vs Hong Kong) यांच्यातील मलेशिया त्रिकोणी टी 20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील सहावा टी 20 सामना आज म्हणजेच 15 मार्च रोजी क्वालालंपूर (Kuala Lumpur) येथील बायुमास ओव्हल (Bayuemas Oval) येथे खेळवण्यात आला. या सामन्यात हाँगकाँगने मलेशियाचा 8 गडी राखून पराभव केला. यासह, हाँगकाँगने तिसरा विजय मिळवला आणि मलेशियाला चौथा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात आयुष शुक्लाने शानदार गोलंदाजी केली. आयुष शुक्लाने 3.4 षटकांत 12 धावा देत 3 बळी घेतले. आयुष शुक्लाला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरल्याने हा निर्णय मलेशियाच्या बाजूने गेला नाही. मलेशियन संघ 18.4 षटकांत 94 धावांवर ऑलआउट झाला. मलेशियाकडून कर्णधार सय्यद अझीझने सर्वाधिक 44 धावांची खेळी खेळली. ज्यामध्ये त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय अस्लम खानने 15 धावांचे योगदान दिले. हाँगकाँगकडून आयुष शुक्ला आणि एहसान खान यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर अतिक इक्बाल आणि अनस खान यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

95 धावांचे लक्ष्य हाँगकाँगने 12.5 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले. हाँगकाँगकडून झीशान अलीने सर्वाधिक 45 धावा केल्या. याशिवाय अंशुमन रथने 25 धावा केल्या. मलेशियाकडून पवनदीप सिंग आणि मुहम्मद वाफिक यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.