PC-X

Norway Chess 2025: मॅग्नस कार्लसन ( नॉर्वे बुद्धिबळ 2025 स्पर्धेचा ( Norway Chess 2025) विजेता ठरला आहे. विजयानंतर प्रतिक्रीया देत त्याने म्हटले की, 'मला खूप चांगले वाटत आहे. स्पर्धा जिंकणे हे दिलासादायक आहे. स्पर्धा खूप चढ-उतारांची होती, परंतु शेवटी सर्वकाही चांगले झाले.' डी गुकेश (D Gukesh) आणि अर्जुन एरिगाईसी बद्दल बोलताना कार्लसन म्हणाला की, 'सर्वजण खूप चांगले खेळले. मात्र, सर्वांना तयारीसाठी अजूनही थोडा वेळ हवा आहे. आर्मेनियामध्ये एक स्पर्धा सुरू आहे, जिथे भारताचे आर प्रज्ञानंद आणि अरविंद चिदंबरम यांनी खूप चांगले बुद्धिबळ खेळले.'

गुकेशविरुद्धच्या सामन्यातील पराभवालर कार्लसन म्हणाला की, 'जरी ती चांगली आठवण नसली तरी, सामना नेहमीच लक्षात राहील.' नॉर्वे बुद्धिबळ 2025 स्पर्धा जिंकल्यानंतर मॅग्नस कार्लसन स्पर्धेतील त्याचा अनुभव व्यक्त केला. मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद पटकावले, त्याने 69,000 अमेरेकी डॉलरची रक्कम मिळवली. गुकेशने स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.

महिला गटात युक्रेनियन खेळाडूचा विजय

युक्रेनियन ग्रँडमास्टर अॅणा मुझीचुक म्हणाली, 'खूप आनंदी आहे. या स्पर्धेत विजयाचा अर्थ खूप आहे. मला वाटते की हे एक मोठे यश आहे. भारताला नवीन पिढीकडून अनेक नवीन आणि चांगले खेळाडू मिळत आहेत. परंतु जुन्या पिढीकडे कोनेरू हम्पीसारखे दिग्गज खेळाडू देखील आहेत. मी माझा पहिला सामना कोनेरूसोबत फक्त सात वर्षांची असताना खेळली होती. त्यावेळी ती 10 वर्षांची होती. ही गोष्ट 28 वर्षांपूर्वीची आहे. मुझीचुक म्हणाली की, भारत पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. मला वाटते की येत्या काळात आणखी बरेच खेळाडू येतील, ज्यांच्याविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असेल.