Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे खेळवला जाणार आहे. या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
With #LSG & #MI gearing up for #Ekana showdown, who will reign supreme? 👀#IPLonJioStar | #LSGvMI | FRI, 4th APR, 6:30 PM | LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & @JioHotstar pic.twitter.com/pR7TYJCAaH
— Star Sports (@StarSportsIndia) April 3, 2025
किती वाजता सुरु होणार सामना?
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 चा 16 वा सामना शुक्रवार, 04 एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील. (हे देखील वाचा: TATA IPL Points Table 2025 Update: कोलकाताने हैदराबादचा पराभव करुन नोंदवला दुसरा विजय, एसआरएची शेवटच्या स्थानावर घसरण; येथे पाहा अपडेटड पॉइंट्स टेबल)
कुठे पाहणार लाईव्ह सामना?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर MI विरुद्ध LSG आयपीएल 2025 चा 16 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई, प्रिन्स दीपका यादव/आकाश दीप
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार आणि विघ्नेश पुथूर/सत्यनारायण राजू