भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिका रविवारीपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला जाईल. भारतीय संघ (Indian Team) नवीन वर्षाची सुरुवात विजयासह करू पाहत असेल. मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाचा मालिकेत आघाडी मिळवायचा प्रयत्न असेल. भारत आणि श्रीलंका संघांमधील टी-20 मालिकेत भारताने आजवर वर्चस्व राखले आहे. वर्षाच्या या पहिल्या सामन्यात भारतीय संघ काही केले जाईल. श्रीलंकाविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली आहे, तर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे, यंदा धवनसह यंदा या मालिकेत डावाची सुरुवात केएल राहुल (KL Rahul) करेल. (India VS Sri Lanka T20 Macth: जसप्रीत बुमराह याचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, मलिंगाने काहीही शिकवले नाही!)
श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाचा पहिला टी-20 सामना रविवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजेपासून खेळला जाईल, तर संध्याकाळी 6.30 वाजता टॉस होईल. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. या मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग आपण हॉटस्टारवर पाहू शकता.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या भारतीय संघात तीन खेळाडू यंदा या मालिकेत नाहीत. अशा परिस्थितीत, आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल निश्चित आहेत. रोहितअव्वाजी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांना दुखापतीमुळे बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे, भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीत बदल होणे निश्चित आहे. शिवाय, जसप्रीत बुमराह यानेही दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, श्रीलंका संघातदेखील अँजेलो मॅथ्यूज याने टी-20 संघात पुनरागमन केले आहे. लसिथ मलिंगा संघाचे नेतृत्व करेल.
असा आहे भारत-श्रीलंका संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सैमसन, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंगण सुंदर.
श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), कुसल परेरा, दनुष्का गुणथिलाका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशादा फर्नांडो, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा, लक्षन संदकन, धनंजया डी सिल्वा, लाहिरू कुमारा, ईसूरु उदाना.