अंडर-19 विश्वचषक (World Cup) 2020 चा पहिला सेमीफायनल सामना भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात खेळला जाणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा स्पर्धेतील सर्वात मोठा सामना असल्याचे म्हटले जात आहे. सेमीफायनलपर्यंत दोन्ही संघ अजिंक्य राहिले आहेत. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तर पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला. आयसीसी अंडर-19 विश्वचषकचा सामन्याचा संभंध आयसीसी (ICC) विश्वचषक 2011 सोबत जोडला जात आहे. त्यावेळी, उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता आणि सेमीफायनल सामन्यात त्यांचा पाकिस्तानविरुद्ध सामना झाला होता. यावेळीही भारत अंडर-19 संघाने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असून सेमीफायनलयामध्ये त्यांचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
भारत-पाकिस्तान पहिला सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिकेच्या पॉचेफस्टरूममधील सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूमच्या मैदानावर खेळला जाणार आहे. पहिला उपांत्य सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता, तर नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 3 चॅनेलवर असेल. शिवाय, सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलभ असेल.
मागील चार सामन्यांमध्ये भारताने श्रीलंका, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दुसरीकडे, पाकिस्तानदेखील ग्रुप फेरीत अजिंक्य राहिला, मात्र त्यांचा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पाकिस्तानने स्कॉटलंड, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानचा पराभव केला, तर बांग्लादेशविरुद्ध त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारतासाठी यशस्वि जयस्वालने फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे, तर रवि बिश्नोईने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे, तर कार्तिक त्यागीने आपल्या वेगवान गोलंदाजीवर प्रभाव पाडला आहे.
भारत अंडर-19 टीम: प्रियम गर्ग (कॅप्टन), आकाश सिंह, अथर्व अंकोलेकर, शुभांग हेगड़े, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटिल, रवि बिश्नोई, शशवत रावत, दिव्यांक्ष सक्सेना, तिलक सक्सेना.
पाकिस्तान अंडर-19 टीम: रोहेल नजीर (कॅप्टन आणि विकेटकीपर), हैदर अली (उपकर्णधार), अब्बास अफरीदी, कासिम अकरम, आमिर अली, अब्दुल बंगलाजई, मोहम्मद हारिस, फहद मुनीर, मोहम्मद उरु, ताहिर हुसैन, अमीर खान, अरीश अली खान, मोहम्मद इरफान खान, मोहम्मद वसीम, मोहम्मद शहजाद.