टीम इंडियाने (India) न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्याची सुरुवात विजयाने करत आपले मनोबल मजबूत केले आहे. रविवारी विराट कोहलीचा संघ दुसर्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरला आहे, तेव्हा त्यांचे लक्ष मालिकेत वर्चस्व कायम राखून 2-0 ने आघाडी घ्यायचा प्रयत्न असेल. परंतु ईडन पार्कच्या (Eden Park) या छोट्या स्टेडियम गोलंदाजांसाठी सर्वात मोठी कसोटी सिद्ध होईल. मागील सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांची धुलाई झालेलं चित्र समोर आले आणि यंदाही असेच होईल असे दिसत आहे. ऑकलंडमधील याच मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी केली आणि टी -20 च्या इतिहासात चौथ्यांदा200 किंवा अधिकचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या विक्रमाची नोंद केली. न्यूझीलंडने 203 धावांची भक्कम धावसंख्या उभारली असली तरी भारताने 19 ओव्हरमधेच सामना संपविला. (IND vs NZ 1st T20I: टीम इंडियाचा विजयी सलामी, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 मध्ये 6 विकेटने मिळवला विजय)
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेचा दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12. 20 वाजता इडन पार्क, ऑकलंड मध्ये सुरू होईल. नाणेफेक सकाळी 11.50 वाजता होईल. भारतीय चाहत्यांसाठी या सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
2020 हे वर्ष टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वर्ष असून भारतीय संघ त्यांच्या संयोजनात समन्वय बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मध्यम ऑर्डरचा फलंदाज श्रेयस अय्यर हा भारताच्या दीर्घकालीन चौथ्या क्रमांकाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वात योग्य खेळाडू असल्याचे दिसून यात आहे. अय्यरने चौथ्या क्रमांकावर 58 धावांची नाबाद खेळी केली होती आणि तो 'सामनावीर' ठरला. दुसरीकडे, आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंड मागील सामन्यातील प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल करू शकतात. मैदानावर खेळत किवी संघाला त्यांच्या गोलंदाजीत प्रभाव पडण्याची गरज आहे. मागील सामन्यात फलंदाजांनी शानदार खेळ केला असला तरीही गोलंदाज नियमितपणे विकेट काढू शकले नाही, परिणामी त्यांना सामना गमवावा लागला.
असा आहे भारत न्यूझीलंड संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्रा सिंह चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुग्गेलैन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.