विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया (India) आज ऑकलंडच्या (Auckland) ईडन पार्क (Eden Park) मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पहिला टी-20 सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा नवीन वर्षातील पहिला विदेश दौरा आहे. पण त्याआधी त्याने ऑस्ट्रेलियासारख्या जगातील बलाढ्य संघाला वनडे मालिकेत पराभूत करून दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, वेस्ट इंडीज, श्रीलंकाला घरच्या मैदानात पराभूत केले होते. पण न्यूझीलंडला पराभूत करणे विराट सेनेसाठी सोप्पे जाणार नाही. कोहली न्यूझीलंडच्या भूमीवर कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. विशेष म्हणजे विराट न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा टी-20 सामना खेळणार आहे. न्यूझीलंडमध्ये भारताने एकमेव विजय मिळवला आहे आणि तोही ऑकलंडमध्ये, मात्र जेव्हा रोहित शर्मानेच्या नेतृत्वात भारताने मालिका टीम इंडिया 2-1 ने गमावली होती. टी -20 क्रिकेटमध्ये आज या दोन्ही संघ या मैदानावर दुसऱ्यांदा आमनेसामने येतील. (IND vs NZ T20I 2020: भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेत बनू शकतात 'हे' 5 प्रमुख रेकॉर्डस्; विराट कोहली, रोहित शर्मा यांचे ऐतिहासिक कामगिरी वर लक्ष)
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेचा पहिला टी-20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12. 20 वाजता इडन पार्क, ऑकलंड मध्ये सुरू होईल. नाणेफेक सकाळी 11.50 वाजता होईल. भारतीय चाहत्यांसाठी या सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
भारतीय संघाच्या बहुतेक परदेश दौऱ्याच्या तुलनेत न्यूझीलंड दौरा नेहमीच त्यांच्यासाठी थोडा कठीण राहिला आहे. न्यूझीलंडच्या बहुतेक खालेदूंना दुखापत झाली असली तरीही, घरच्या मैदानावर खेळत किवी संघ भारतासमोर आव्हानात्मक खेळ करण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, भारतीय संघासाठी यंदा टी-20 मालिकेत रोहित शर्मा-केएल राहुलची जोडी पुन्हा डावाची सुरुवात करतील. या दौऱ्याआधी भारताला दोन मोठे धक्के लागले शिखर धवनला दुखापतीमुळे दौऱ्याला मुकावे लागले, तर इशांत शर्माला रणजी सामन्यात दुखापत झाल्याने त्याला टेस्ट मालिकेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
असा आहे भारत न्यूझीलंड संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्रा सिंह चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुग्गेलैन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.