
मुंबईत खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात अनपेक्षित 10 विकेटने पराभवाला सामोरे गेल्यावर भारतीय संघा (Indian Team) समोरची आव्हाने वाढली आहेत. वानखेडेमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे कामगिरी केली त्यात एक प्रकारे यजमान संघाच्या अनेक उणीवा अधोरेखित झाल्या आहेत आणि आता विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात भारतीय संघ शुक्रवारी दुसर्या वनडे सामन्यात आव्हानात्मक पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. मालिकेचा दुसरा सामना 17 जानेवारी रोजी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात ऑस्ट्रेलिया एका बाजूला मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळविण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल, तर टीम इंडिया (India) सामना जिंकून मालिकेत स्वत:चे आव्हान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. ऑस्ट्रेलियाचा हा संघ खूपच मजबूत आहे आणि त्याच्याविरुद्ध पुनरागमन करण्याचे भारतासमोर कठीण आव्हान असेल. (IND vs AUS 2nd ODI 2020: विराट कोहली-अॅडम झांपा, रोहित शर्मा-मिशेल स्टार्क; राजकोट वनडेत या खेळाडूंमध्ये पाहायला मिळेल रोमांचक लढत)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचा दुसरा सामना दुपारी दीड वाजता राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सुरू होईल. नाणेफेक दुपारी एक वाजता होईल. भारतीय चाहत्यांसाठी सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. रिषभ पंतला मागील सामन्यात दुखापत झाल्याने त्याला या सामन्याला मुकावे लागत आहे. तर, भारताच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील बदल पाहायला मिळू शकतो. कर्णधार कोहली पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या फलंदाजीत बदल होईल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला प्लायन्ग इलेव्हनमध्ये बदल करण्याची गरज नाही आहे.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया वनडे संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, आणि युजवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), डार्सी शॉर्ट, अॅश्टन टर्नर, जोश हेजलवुड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अॅडम झँपा, अॅस्टन अगार, पीटर हैंडस्कोम्ब.