ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credits: Getty Images)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने (Australia) अपराजित आघाडी घेतली आहे. आता त्याला मालिकेचा अंतिम सामना शुक्रवारपासून खेळायचा आहे. हा सामना सिडनीच्या सिडनी (Sydney) क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे आणि आता अखेरचा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीप करू पाहिलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडला 296 आणि दुसऱ्या टेस्टमध्ये 247 धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत करत मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर दुसऱ्या टेस्टमध्ये जिंकण्यासाठी 488 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण किवी संघ 240 धावांवर ऑल-आऊट झाला. टॉम ब्लंडेल याने किवींकडून 121 धावांची शानदार खेळी साकारली, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा तिसरा सामना सिडनीच्या एससीजी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे साडेदहा वाजता आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सामना सुरु होईल. सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्क (एसपीएसएन) न्यूझीलंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे अधिकृत प्रसारक आहे आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा थेट प्रसारण दाखवेल. भारतात चाहते हा सामना Sony SIX आणि Sony SIX HD वर लाईव्ह पाहू शकतात. भारतीय प्रेक्षक हा सामना ऑनलाईन Sony Liv ऍप्पवर लाईव्ह पाहू शकतात.

तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने अपरिवर्तित प्लेयिंग इलेव्हन जाहीर केली. ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात प्रभावी कामगिरी केली, त्यामुळे त्यांच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न होणे हे साहजिक होते. मात्र, या उलट न्यूझीलंड संघ मुश्किलत अडकला आहे. किवी संघाचे तीन खेळाडू- कर्णधार केन विल्यमसन, हेन्री निकोलस आणि मिशेल सॅटनर आजारी आहेत, त्यामुळे त्यांच्या खेळण्यावर अनिश्चितता आहे. टीम अधिकाऱ्यांनुसार विल्यमसन आणि निकोलसना नवीन वर्षाच्या दिवशी “फ्लूसारखी लक्षणे” समोर आल्यावर प्रशिक्षणावरून घरी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी सुरू होणाऱ्या तिसर्‍या कसोटीत हे दोन फलंदाज किंवा सॅनटनर खेळतील की नाही याची टॉम लाथम खात्री देऊ शकला नाही. ग्लेन फिलिप्स याला कर्णधार केनचा कव्हर म्हणून बोलावण्यात आले आहे.

असा आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड टेस्ट संघ

ऑस्ट्रेलिया: डेविड वॉर्नर, जो बर्न्स, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), मायकेल नेसर, मॅथ्यू वेड, जेम्स पॅटीनसन, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, नाथन लायन आणि पॅट कमिन्स.

न्यूझीलंड: हेन्री निकोलस, जीत रावल, केन विल्यमसन (कॅप्टन), रॉस टेलर, लिन डी ग्रैंडहोम, मिशेल सॅंटनर, टोड एस्टल, बीजे वाटलिंग, ग्लेन फिलिप्स, टॉम ब्लंडेल, टॉम लाथम, काइल जैमीसन, मॅट हेन्री, नील वाग्नर, टिम साउथी आणि विलियम सोमरविल.