श्रीलंकाविरुद्ध इंदोरच्या होळकर स्टेडियममधील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला आणि श्रीलंकेचा 7 विकेटने धुव्वा उडवला. या विजयसह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताकडून केएल राहुल याने सर्वाधिक 45 तर शिखर धवन याने 22 धावा केल्या.
IND 144/3 in 17.3 Overs (Target 143/9) | IND vs SL 2nd T20I Score Updates: भारताचा श्रीलंकेविरुद्ध 7 विकेटने विजय
भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज इंदोरच्या होळकर स्टेडियमवर (Holkar Stadium) खेळला जाईल. गुवाहाटीमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दुसऱ्या सामन्याने मालिकेला सुरुवात होत आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेऊ इच्छित असेल. गुवाहाटी वॉशआऊटनंतर भारत आणि श्रीलंका दोघेही नवीन वर्षात आपले खाते उघडत विजयी आघाडी घेण्याच्या उद्धेशान्त मैदानात उतरतील. आजचा सामना जिंकून श्रीलंका भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. मात्र, श्रीलंकासह अजून एकावर दबाव असणार आहे आणि तो म्हणजे टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan). दुखापतीमुळे महत्वाच्या मालिका न खेळू शकलेला धवन या मालिकेसह पुनरागमन करत आहे. टीम इंडियामध्ये आपले स्थान कायम ठेवण्यासाठी धवनला या मालिकेत प्रभावी कामगिरी करण्याची गरज आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) याने सलामी फलंदाज म्हणून प्रभावी कामगिरी केली आणि संघात स्थान जवळ-पास निश्चित केले. या मालिकेद्वारे धवनला फॉर्ममध्ये परतण्याची संधी आहे. त्याने शेवटच्या 13 डावांमध्ये एकही अर्धशतक केले नाही. यंदा त्याचा साथीदार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने धवन राहूलसह डावाची सुरूवात करेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
योगायोगाने, होळकर स्टेडियमवरील पहिला टी-20 सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला आणि टीम इंडियाने यात 88 धावांनी विजय मिळवला होता. टीम इंडियाचा होळकर स्टेडियमवरील रेकॉर्ड चांगला आहे, त्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये या मैदानावर खेळत एकही सामना गमावला नाही. संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारत विजयाचा प्रभात दावेदार आहे, मात्र श्रीलंकेला ते कमी लेखू शकत नाही. श्रीलंकेने ऑक्टोबर 2019 मध्ये पाकिस्तान दौर्यावर टी -20 मालिकेत 3-0 ने यजमानांना क्लीन स्वीप केले होते. मात्र, त्यानंतर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
असा आहे भारत-श्रीलंका संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सैमसन, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), कुसल परेरा, दनुष्का गुणथिलाका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा, लक्षन संदकन, धनंजया डी सिल्वा, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.