भारत आणि पाकिस्तानमधील अंडर-19 विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात माजी गतजेता टीम इंडियाने 10 विकेटने विजय मिळवला आणि विश्वचषकच्या फायनलमध्ये धडक मारली. पाकिस्तानने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 173 धावांचे लक्ष्य भारताने 35.2 ओव्हरमधेच गाठले. भारताने पहिले गोलंदाजीने आणि नंतर फलंदाजीने कमाल कामगिरी करत विजयाची नोंद केली.
IND vs PAK U19 World Cup 2020 Semi-Final Highlights: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडिया, पाकिस्तानला केले पराभूत
अंडर-19 विश्वचषक (World Cup) मधील पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताचा (India) सामना मंगळवारी पाकिस्तानशी (Pakistan( होईल. दोन्ही संघांचा सलग दुसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये आमने-सामने येत आहे. 2018 मध्ये अखेरच्या वेळी भारताने पाकिस्तानला 203 धावांनी पराभूत केले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवर खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. मात्र, 8 वर्षांपासून टीम इंडिया त्याच्याविरूद्ध पराभूत झालेली नाही. पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा अखेरचा पराभव 2010 मध्ये झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने सेमीफायनल सामना 2 गडी राखून जिंकला होता. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत केले तर ते 7 व्या वेळी अंतिम फेरी गाठू शकतील. भारत पहिल्यांदा 2000 मध्ये अंतिम फेरी गाठली होती आणि तेव्हा ते चॅम्पियन बनले होते.
या स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले. त्यानंतर जपान आणि न्यूझीलंडविरूद्ध सामना जिंकत क्वार्टर फायनल फेरी गाठली. आणि नंतर उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात पाकिस्तानने स्कॉटलंडचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी झिम्बाब्वेला पराभूत केले. त्यानंतर पावसामुळे बांग्लादेशविरुद्ध सामना रद्द करण्यात आला होता, उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला. या स्पर्धेत यशस्वी जयस्वालने भारतासाठी सर्वाधिक 207 धावा केल्या. गोलंदाजीत रवी बिश्नोई सर्वाधिक यशस्वी झाला. त्याने 4 सामने 11 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद हॅरिस याने फलंदाजीने प्रभावित केले. त्याने 4 सामन्यांत 110 धावा केल्या. गोलंदाजीत अब्बास आफ्रिदीने 4 सामन्यात सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या.
असा आहे भारत-पाकिस्तानअंडर-19 संघ
भारत अंडर-19 टीम: प्रियम गर्ग (कॅप्टन), आकाश सिंह, अथर्व अंकोलेकर, शुभांग हेगड़े, यशसवी जयस्वाल, ध्रुव जुरेल, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटिल, रवि बिश्नोई, शशवत रावत, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, सिद्धेश वीर, दिव्यांश जोशी.
पाकिस्तान अंडर-19 टीम: रोहेल नजीर (कॅप्टन आणि विकेटकीपर), हैदर अली (उपकर्णधार), अब्बास आफ्रिदी, कासिम अक्रम, आमिर अली, अब्दुल बांगलझई,मोहम्मद हॅरिस, फहाद मुनीर, मोहम्मद हुरैरा, ताहिर हुसेन, अमीर खान, अरीश अली खान, मोहम्मद इरफान खान, मोहम्मद वसीम, मोहम्मद शहजाद.