टीम इंडियाविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने 4 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताने दिलेल्या 347 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत किवी संघाने रॉस टेलर याचे शतक, हेन्री निकोल्स आणि कर्णधार टॉम लाथम यांच्या अर्धशतकाच्या जोरावर विजय मिळवला. 

न्यूझीलंडला पहिला वनडे जिंकण्यासाठी 30 चेंडूत 21 धावांची गरज आहे. रॉस टेलर 103 आणि जेम्स निशाम 9 धावा करून खेळत आहे. 

भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 69 च्या वैयक्तिक धावांवर कीवी कर्णधार टॉम लाथमला बाद करून भारतीय संघाला चौथे यश मिळवून दिले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टनच्या सेडान पार्क स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कीवी संघाने 40 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी गमावून 292 धावा केल्या आहेत. रॉस टेलर सध्या 93 आणि कर्णधार टॉम लाथम 62 धावा करून खेळत आहे. विजयासाठी अद्याप संघाला 61 चेंडूंत 60 धावांची आवश्यकता आहे.

कुलदीप यादव ने 34 वी ओव्हर टाकली आणि टॉम लाथमने षटकातील तिसर्‍या चेंडूवर षटकार खेचला न्यूझीलंडची धावसंख्या 200 वर आणली. रॉस टेलर आणि टॉम लाथम यांनी 43 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली आणि 37 ओव्हरनंतर किवी संघाने 3 गडी गमावून 250 धावा पूर्ण केल्या.  न्यूझीलंडला 78 चेंडूत अजून 98 धावा करायच्या आहेत.  टेलर 73 आणि लाथम 41 धावा करून खेळत आहे. 

न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी 8.82 च्या धावांच्या दराने धावा करण्याची आवश्यकता आहे, मात्र सध्या ते केवळ 5.77 च्या दराने धावा करत आहेत. लाथम आणि टेलर मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण त्यांना धावांचा वेगही वाढवावा लागणार आहे. न्यूझीलंडला विजयासाठी 107 चेंडूत अजून 159 धावांची गरज आहे. 

किवी संघाला तिसरा धक्का हेन्री निकोलसच्या रूपात लागला, जो विराट कोहलीच्या जबरदस्त फिल्डिंगचा शिकार बनला आणि 11 चौकार मारत 78 धावा केल्या. 

भारताने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 348 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात किवी सलामी फलंदाज हेन्री निकोल्स शतकाच्या जवळ पोहचला आहे. निकोल्स सध्या 77 धावा करून खेळत आहे. न्यूझीलंडने 26 ओव्हरयामध्ये 2 विकेट्स गमवून 156 धावा केल्या. रॉस टेलर 26 धावा करून निकोल्सला साथ देत आहे. 

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 9 धावांच्या वैयक्तिक धावांवर कीवी फलंदाज टॉम ब्लंडलला बाद करून टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. ब्लंडलने 10 चेंडूंचा सामना करत एक चौकार ठोकला.

हेन्री निकोलसने 18 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला आणि 60 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या डावात त्याने 6 चौकार लगावले.

Load More

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना आतापासून काही मिनिटांनी हॅमिल्टनच्या सेडन पार्क (Seddon Park) स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ वनडे मालिकेची सुरुवात विजयासह करू इच्छित आहेत. एकीकडे टीम इंडिया टी-20 मालिकेतील लय कायम ठेवू इच्छित असेल, तर दुसरीकडे टी-20 मालिकेतील पराभव विसरून पुढे जाण्याकडे कीवी संघ लक्ष केंद्रित करेल. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने न्यूझीलंडचा 5-0 ने क्लीन स्वीप केला होता. टी-20 मालिकेत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली होती. संघाच्या फलंदाजीपासून ते गोलंदाजीपर्यंत सर्व काही ठीक होते. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत टीम इंडियात काही बदल दिसून येऊ शकतात. नवीन सलामी जोडीपासून एक नवीन गोलंदाज या मालिकेतील आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण करू शकतात.

भारताची नियमित सलामी जोडी रोहित शर्मा-शिखर धवन नसल्याने त्यांच्या जागी स्थान मिळालेले पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल डावाची सुरुवात करतील. किवी दौऱ्याआधी धवनला आणि पाचव्या टी-20 सामन्यात रोहित दुसखापत झाल्याने धवनच्या जागी पृथ्वी आणि रोहितच्या जागी मयंकला संधी देण्यात आली आहे. तर, नवदीप सैनी त्याचा पहिला वनडे सामना खेळू शकतो. दुसरीकडे, नियमित किवी कर्णधार केन विल्यमसन यालाही दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांसाठी बाहेर करण्यात आले आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लाथम संघाचे नेतृत्व करेल. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत वनडे टीम: केएल राहुल (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, पृथ्वी शॉ, कुलदीप यादव, केदार जाधव, रिषभ पंत, शार्दुल ठाकुर.

न्यूझीलंड वनडे टीम: मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, टॉम लाथम (कॅप्टन/विकेटकीपर), मार्क चैपमैन, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सॅटनर, टिम साउथी, हामिश बेनेट, ईश सोढी, टॉम ब्लंडेल, काइल जैमिसन, स्कॉट कुग्गेलैन.