Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 23, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

AUS 258/0 in 37.4 Overs (Target: 256) | IND vs AUS 1st ODI Live Score Updates: मुंबईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्द भारताचा लाजीरवाणा पराभव, 10 विकेटने उडवला विराट सेनेचा धुव्वा

क्रिकेट Priyanka Vartak | Jan 14, 2020 08:28 PM IST
A+
A-
14 Jan, 20:28 (IST)

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील पहिल्या वनडे सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. डेविड वॉर्नर आणि आरोन फिंच यांच्या द्विशतकी भागीदारीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने 10 विकेटने विराट सेनेचा धुव्वा उडवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. वॉर्नर आणि फिंच अनुक्रमे 128, 110 धावांवर नाबाद परतले. 

14 Jan, 20:01 (IST)

डेव्हिड वॉर्नरने 18 वे वनडे शतक ठोकले. वॉर्नरने 88 चेंडूत शतक ठोकले. भारताने दिलेल्या 256 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी वर्चस्व कायम ठेवले. दोंघांनी द्विशतकी भागीदारी केली. फिंच 91 धावा करून खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला आता जिंकण्यासाठी 108 चेंडूत 41 धावांची आवश्यकता आहे. 

14 Jan, 19:33 (IST)

ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी डेविड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली दोघांनी एकही विकेट न गमावता 150 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली असून त्यांना विजयासाठी ९० धावांची गरज आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 255 धावा केल्या. 

14 Jan, 19:28 (IST)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच आणि डेविड वॉर्नर यांच्या 150 धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. भारताने दिलेल्या 256 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने एकीही विकेटन गमावता 23 ओव्हर मध्ये 156 धावा केल्या आहेत. दोघेही आता त्यांच्या शतकाच्या जवळ पोहचले आहे. फिंच 66 आणि वॉर्नर 76 धावा करून खेळत आहे. आणि भारत सर्वात मोठ्या पराभवाकडे जात आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आता फक्त 100 धावांची गरज आहे. 

14 Jan, 19:19 (IST)

भारतासाठी 20 वी ओव्हर फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने टाकली. जडेजाच्या या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दोन एकेरी, एक चौकार आणि एका चौकाराच्या मदतीने एकूण सात धावा केल्या. 20 ओव्हरनंतर संघाची धावसंख्या 140/0 आहे. आरोन फिंच 61 आणि डेव्हिड वॉर्नर 66 धावा करून खेळत आहे.

14 Jan, 18:56 (IST)

भारताने दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करत ऑस्ट्रेलियाचे सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि कर्णधार आरोन फिंच यांनी अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरने 40 चेंडूत 21 वे अर्धशतक, तर फिंचने 52 चेंडूंचा सामना करत अर्धशतक पूर्ण केले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे. 

14 Jan, 18:45 (IST)

भारताने दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने 10 ओव्हर संपल्यानंतर कोणतीही विकेट न गमावता 84 धावा केल्या आहेत. संघाकडून कर्णधार आरोन फिंच 41 आणि डेव्हिड वॉर्नर 37 धावा करून खेळत आहे. खेळत आहे. 

14 Jan, 18:23 (IST)

भारताकडून जसप्रीत बुमराहने सातवी ओव्हर टाकली. बुमराहच्या दुसर्‍या चेंडूवर वॉर्नरने चौकार लगावला आणि वनडे कारकिर्दीतील 5000 धावा पूर्ण केल्या. 7 ओव्हरनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर 46/0. 

14 Jan, 18:09 (IST)

टीम इंडियाने दिलेल्या २५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत कर्णधार आरोन फिंच आणि डेविड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाला वेगवान सुरुवात करून दिली. फिंच 25, तर वॉर्नर 5 धावांवर खेळत आहे. भारतीय गोलंदाज विकेटसाठी प्रयत्नशील आहे. 

14 Jan, 17:58 (IST)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना रिषभ पंतच्या डोक्यावर चेंडू लागला. ज्यामुळे त्याला चक्कर आली. त्यामुळे, आता त्याच्या जागी केएल राहुल विकेटकिपिंग करताना दिसत आहे. 

Load More

मंगळवार 14 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलिया (Australia) संघाची मुंबई दौर्‍यावरुन भारत (India) दौर्‍याची सुरूवात होईल. तीन वनडे सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया वेगळ्या स्वरूपात आणि मजबूत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मैदानात उतरेल. तीन वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघासाठी (Indian Team) सलामीची गाठ अद्याप गुंतागुंतीची आहे. मात्र, सामन्याच्या एक दिवसाआधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने म्हटले कि रोहित शर्मा, शिखर धावा आणि केएल राहुल तिघे प्लेयिंग इलेव्हनचा भाग होऊ शकतात आणि तो स्वतः फलंदाजीसाठी खालच्या स्थानावर येऊ शकतो. रोहितचं सलामीला येणं निश्चित आहे, पण दुसरीकडे इन-फॉर्म राहुल आणि अनुभवी धवन यांच्यातदुसर्‍या टोकासाठी चुरशीची स्पर्धा आहे. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय मालिकेत वैयक्तिक स्पर्धाही दिसतील ज्यात रोहित शर्मा विरुद्ध डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली विरुद्ध स्टीव्ह स्मिथ यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळेल. अ‍ॅलेक्स कॅरी याची आक्रमक फलंदाजी आणि शानदार विकेटकीपिंगला भारताच्या रिषभ पंत याच्याकडून आव्हान मिळेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांच्या उपस्थितीमुळे भारताचा वेगवान गोलंदाजीचा आक्रमण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कसोटी घेण्यासाठी सज्ज असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे आयपीएलचे सर्वात महागडे परदेशी खेळाडू पॅट कमिन्स, केन रिचर्डसन आणि अनुभवी मिशेल स्टार्क सारखे वेगवान गोलंदाज आहेत जे कोहली आणि संघाला त्रास देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटविणारा ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नूस लाबूशेन आपल्या सर्वोत्तम फॉर्मची पुनरावृत्ती वनडेमध्ये करू इच्छित आहे.

असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया वनडे संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, आणि युजवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), डार्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन टर्नर, जोश हेजलवुड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झांपा, अ‍ॅस्टन अगार, पीटर हैंडस्कोम्ब.


Show Full Article Share Now