Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
18 minutes ago

U19 World Cup 2020 Final Highlights: भारताला पराभूत करून बांग्लादेश ने जिंकला अंडर-19 विश्वचषक विजेता

क्रिकेट Priyanka Vartak | Feb 09, 2020 10:04 PM IST
A+
A-
09 Feb, 21:46 (IST)

भारत-बांग्लादेश अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये टॉस गमवून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने दिलेल्या 178 धावांच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने 3 विकेटने विजय मिळवला आणि स्पर्धेचे जेतेपद जिंकले. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बांग्लादेशला नियमानुसार सुधारित 170 धावांचे लक्ष्य मिळाले जे त्यांनी 42.1 ओव्हरमध्ये गाठले. बांग्लादेशकडून सलामी फलंदाज परवेझ हुसेन इमोन याने संघर्ष केला. इमोन 47 धावांचा डाव खेळला. बांग्लादेशी कर्णधार अकबर अली ने नाबाद 43 धावांचा खेळ केला आणि बांग्लादेशला पहिल्यांदा आयसीसीचे जेतेपद मिळवून दिले. 

09 Feb, 21:41 (IST)

पावसामुळे बांगलादेशला कवर्थ लुईस नियमाप्रमाणे मिळालेल्या सुधारित लक्ष्यानुसार 30 चेंडूत 7 धावांची गरज. 

09 Feb, 21:26 (IST)

अंडर-19 विश्वचषकचे पहिल्यांदा जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असताना पावसाळा सुरुवात झाली आहे. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे त्यांच्याकडे 16 धावांची आघाडी आहे. जर खेळाडू मैदानावर परतले नाही नाहीत तर बांग्लादेशला विश्वचषक विजेता घोषित केले जाईल.

09 Feb, 21:00 (IST)

भारत-बांग्लादेशमधील अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. याचा नुकसान भारताला होणार आहे कारण बांगलादेशकडे डकवर्थ/लुईसनियमाप्रमाणे 2 धावांची आघाडी आहे. 26 ओव्हरनंतर बांग्लादेशने 147 धावा केल्या आहेत. 

09 Feb, 19:34 (IST)

भारतीय गोलंदाजांनी भारताचा विजय जवळपास निश्चित केला आहे. रवि बिश्नोईच्या चार विकेट्सनंतर सुशांत मिश्राने बांग्लादेशला पाचवा धक्का दिला. सुशांतने शमीम हुसेनला यशस्वी जयस्वालकडे कॅच आऊट केले. हुसेनने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण यशस्वीने पुढे उडी मारत कॅच पकडला. टीम इंडियाला विजयासाठी अजून पाच विकेट्सची गरज आहे. 

09 Feb, 19:25 (IST)

सामन्यात रवी बिश्नोईने भारताला पुनरागमन करून दिले आहे. त्याने शहादत हुसेनला आपला चौथा बळी बनवला. बांग्लादेशने एकावेळी 50 धावांवर एकही विकेट गमावली नव्हती, पण 65 धावांवर त्यांनी आता चार विकेट्स गमावल्या आहेत. 

09 Feb, 19:04 (IST)

भारतीय गोलंदाजांनी भारताच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तौहीद हृदयच्या रूपात बांग्लादेशला तिसरा झटका लागला. बिश्नोईने 62 धावांवरहृदॉयला एलबीडब्ल्यू आऊट केले. भारताला जिंकण्यासाठी ७ विकेट हव्या आहेत, बांग्लादेशला अजून 35 ओव्हरमध्ये 114 धावांची गरज आहे. 

09 Feb, 18:49 (IST)

13 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रवी बिश्नोईने भारताला दुसरे यश मिळवून दिले. बांग्लादेशचा महमूदुल हसन जॉयला 12 चेंडूत 8 धावांवर बिश्नोईने बोल्ड केले. रवीने भारताच्या आशा जागवल्या आहेत. 

09 Feb, 18:36 (IST)

भारताला पहिले यश मिळाले. रवी बिश्नोईने हसनला कार्तिक त्यागीने झेलबाद केले. बिश्नोईच्या चेंडूवर हसनने हवेत शॉट मारला जो थेट त्यागीच्या हातात गेला. हसनने 17 धावा केल्या.

09 Feb, 18:00 (IST)

परवेज हुसैन अमन आणि तनजीद हसन यांनी बांग्लादेशकडून टीम इंडियाविरुद्ध डावाची सुरुवात केली. दोंघांनी मिळून 4 ओव्हरमध्ये बांग्लादेशसाठी 28 धावा केल्या. दोघे फलंदाज प्रत्येकी 8 धावा करून खेळत आहे. 

Load More

एका संघाने सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसर्‍याने पहिल्यांदा विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. एक संघ चार वेळा चॅम्पियन बनला, तर दुसर्‍याला विजेतेपद जिंकण्याची प्रथम संधी आहे. असे असूनही भारत (India)-बांग्लादेश (Bangladesh) देशांत एक साम्य आहे. म्हणजेच दक्षिण आफ्रिकामध्ये सुरु असलेल्या 13 व्या अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) मध्ये दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत रविवार, 9 फेब्रुवारी रोजी दोन्ही संघातील विजेतेपदासाठीची स्पर्धा रंजक ठरणार आहे. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दहा गडी राखून पराभूत करून अंतिम फेरी गाठली, तर दुसर्‍या उपांत्य सामन्यात बांग्लादेशने न्यूझीलंडला 6 विकेट्सने हरवून भारताविरुद्ध अंतिम सामना निश्चित केला. भारताने सर्वाधिक सर्वाधिक चार वेळा जिंकली असली तरीही अंतिम फेरीत संघ बांग्लादेशला हलक्यात घेण्याची चूक करू शकत नाही.

बांग्लादेश पहिल्यांदा कोणताही पुरुष विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचला आहे. दुसरीकडे, आज जर भारत जिंकला तर पाचव्यांदा ज्युनियर विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवेल. त्यामुळे, दोन्ही देशांमधील हा सामना ऐतिहासिक आहे. भारतीय अंडर-19 संघाने आजवर ज्या प्रकारचा खेळ दर्शविला ते सिद्ध करते की ते खेळाच्या प्रत्येक विभागात एक उच्च दर्जाचा संघ आहे. यशस्वी जयस्वालने फलंदाजीत तीन अर्धशतक आणि शतक झळकावले आहे. तसेच त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावाही केल्या आहेत. यशस्वीने 156 च्या सरासरीने 312 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, रवी बिश्नोई आणि अथर्व आकोळेकर यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली.


Show Full Article Share Now