Close
Advertisement
 
रविवार, नोव्हेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

IND vs NZ 1st Test Day 1 Highlights: भारत-न्यूझीलंड पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय, दिवसाखेर भारताचा स्कोर 122/5

क्रिकेट Priyanka Vartak | Feb 21, 2020 10:29 AM IST
A+
A-
21 Feb, 10:13 (IST)

भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आहे. चहाच्या घोषणेनंतर पावसाला सुरुवात झाली, पण काही केल्या पाऊस न थांबल्याने पहिला दिवसाचा खेळ वेळेआधीच संपवण्यात आला आहे. भारताने 122 धावांवर 5 विकेट्स गमावल्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत भारतासाठी खेळत आहेत. रहाणे 38 आणि रहाणे 10 धावा करून खेळत आहेत. 

21 Feb, 08:58 (IST)

भारत-न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या चहाची वेळ झाली आहे. या शिवाय चहाची घोषणा केल्याच्या काही वेळानंतर पावसाळा सुरूवात झाली. खेळपट्टीवरवर कव्हर्स घालण्यात आले आहेत.

21 Feb, 08:47 (IST)

वेलिंग्टनमध्ये चहाची वेळी झाली आहे. भारताने 55 ओव्हरनंतर 122 धावांवर 5 विकेट्स गमावल्या आहे. सध्या अजिंक्य रहाणे 38 आणि रिषभ पंत 10 नाबाद धावा करून खेळत आहे. भारताला मोठ्या भागीदारीची गरज आहे. यापूर्वी भारताचे टॉप-ऑर्डर खेळाडू स्वस्तात बाद झाले. टी पर्यंत किवी टीमकडून काईल जेमीसन ने सर्वाधिक तीन गडी बाद केले. 

21 Feb, 08:43 (IST)

अजिंक्य रहाणे च्या सावध खेळीच्या जोरावर भारताने शंभरी पार केली आहे. 55 ओव्हरनंतर भारताने पाच विकेट्स गमावून धावा केल्या. रहाणे 38 आणि रिषभ पंत 10 नाबाद धावा करून खेळत आहे. 

21 Feb, 07:48 (IST)

न्यूझीलंडचे गोलंदाजांनी आज भारतीय फलंदाजांवर दबदबा कायम ठेवला आहे. लंचनंतर भारताने दुसरी विकेट गमावली. काईल जैमीसनने तिसरी विकेट घेत हनुमा विहिरीला स्वस्तात बाद केले. विहारीने आज 20 चेंडूंचा सामना करत 7 धावा केल्या. 

21 Feb, 07:40 (IST)

28 7टॉस गमावून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने 40 ओव्हरनंतर 100 धावा पूर्ण केल्या आहेत. या दरम्यान भारताने चार विकेट्सही गमावल्या आहेत. सध्या उपकर्णधार अजिंक्य रहाणे 28 आणि हनुमा विहारी 7 धावा करून खेळत आहेत. 

21 Feb, 07:13 (IST)

दुखापतीतून पुनरागमन कर्णधार ट्रेंट बोल्टने टीम इंडियाला लंच नंतर पहिला झटका दिला. बोल्टने मयंकला काईल जैमीसनकडे कॅच आऊट केले. टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 88 धावांवर चौथी विकेट गमावली. मयंकने 34 धावा केल्या. 

21 Feb, 07:01 (IST)

दुपारच्या जेवणानंतर खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर उतरले आहेत. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणे 18 आणि मयंक अग्रवाल 29 धावा करून खेळत आहेत.

21 Feb, 06:09 (IST)

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टेस्ट सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या लंच ची वेळी झाली आहे. या दरम्यान भारताने तीन विकेट गमावून 79 धावा केल्या आहेत. सध्या सलामी फलंदाज मयंक अग्रवाल 29 आणि भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद 19 धावा करून खेळत आहे. पृथ्वी 16, चेतेश्वर पुजारा 11 आणि कर्णधार विराट कोहली 2 धावा करून माघारी परतले. 

21 Feb, 05:24 (IST)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताला तिसरा धक्का बसला. काईल जैमीसन ने भारतीय कर्णधार विराट कोहलीला रॉस टेलरकडे कॅच आऊट केले. 100 वा टेस्ट सामना खेळणाऱ्या टेलरने स्लिपमध्ये कोहलीचा सोप्पा झेल पकडला. कोहली 2 धावा करून आऊट झाला आणि अशाप्रकारे भारताने 40 धावांवर तिसरी विकेट गमावली. 

Load More

भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) मधील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेचा पहिला सामना थोड्याच वेळात सुरु होईल. हा सामान वेलिंग्टनच्या (Wellington) बेसिन रिझर्वच्या (Basin Reserve) मैदानावर खेळला जाईल. सध्याच्या दौर्‍यावर भारताने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीप केला, तर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत किवी संघाने टीम इंडियाचा क्लीन स्वीप करत जोरदार पुनरागमन केले. आता एकमेकांविरुद्ध कसोटीत सर्वोत्कृष्ट ठरण्याचे आव्हान असेल. दोन्ही संघात बरेच बदल झाले आहेत. एकीकडे टीम इंडियामध्ये दुखापतीतून सावरल्यानंतर इशांत शर्मा परतला आहे तर वेगवान गोलंदाजी करणारा ट्रेंट बोल्ट किवी संघात परतला आहे. भारतीय संघ अखेरच्या 7 कसोटी सामन्यांमधून अजिंक्य आहे, जो या फॉर्मेटमधील त्यांची विक्रमी खेळी आहे. एकूणच 2011 पासून कोणत्याही संघाने टेस्ट सामन्यात मिळवलेला हा विक्रमी विजय आहे. अशा स्थितीत टीम इंडियासामोर न्यूझीलंडमध्येही विजयी लय कायम ठेवण्याचे आव्हान असेल.

दुसरीकडे, आजचा सामना न्यूझीलंडसाठी खास आहे. पहिल्या टेस्ट सामन्यात जर किवी संघ जिंकला तर तो त्यांचा 100 वा विजय असेल. न्यूझीलंडने आजवर खेळल्या 440 सामन्यात 99 सामने जिंकले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये आजवर सहा देशांनी 100 पेक्षा अधिक सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 393 सामने जिंकले आहेत. मालिके आधी न्यूझीलंडसाठी आलेली सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे त्यांचा टेस्ट क्रिकेटमधील अनुभवी गोलंदाज नील वॅग्नर पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. आपल्या मुलाच्या जन्माच्या निमित्ताने तो आपल्या कुटूंबियांसमवेत असेल आणि या कारणास्तव त्याला वेलिंग्टन कसोटी सामन्यात भाग घेता येणार नाही. मॅट हेन्रीचा त्याच्या जागी कव्हर म्हणून समावेश करण्यात आला आहे. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

असा आहे भारत-न्यूझीलंड टेस्ट संघ

भारत: मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि उमेश यादव.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रैंडहोम, काईल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेन्री निकॉल्स, एजाज पटेल, टिम साउथी, रॉस टेलर, नील वैगनर, बीजे वॉटलिंग.


Show Full Article Share Now