विराट कोहली याच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) रविवारी, 14 डिसेंबरपासून पहिल्या वनडे सामान्यापासून सुरू होणार्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये विंडीज संघाविरूद्ध सलग दहाव्या द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या दृढ हेतूने खेळेल. मालिकेचा पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram) खेळला जाईल. विंडीजविरुद्ध टी-20 मालिका 2-1 ने जिंकल्यावर टीम इंडिया आता वनडे मालिकेतही वर्चस्व कायम ठेवण्याच्या हेतूने मैदानावर उतरतील. विराटच्या संघाला विंडीजच्या पलटवारपासून सावध राहावे लागेल. ज्याप्रकारे विंडीजने टी-20 मालिकेचा दुसरा सामना सहजपणे आठ विकेट्सने जिंकला, त्याला पाहून ते झुंज देऊ शकतात यात शंका नाही. भारतीय संघ मालिका विजयासाठी प्रबळ दावेदार असेल. शिवाय, तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मॅचमधील खेळी पुन्हा करण्याचा टीम इंडियाचा हेतू असेल.
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला वनडे सामना रविवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजेपासून खेळला जाईल, तर दुपारी 1.00 वाजता टॉस होईल. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. या मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग आपण हॉटस्टारवर पाहू शकता.
या मालिकेआधी टीम इंडियाला दोन मोठे झटके लागले आहे. सलामी फलंदाज शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या दोन्ही टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले आहे. धवन आणि भुविच्या जागी टीम इंडियात मयंक अग्रवाल आणि शार्दूल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. आता या दोंघांना टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहणे उत्साहाचे असेल.
असे आहे भारत आणि वेस्ट इंडिज संघ:
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.
वेस्ट इंडिज: सुनील अंब्रिस,शाई होप, खारी पियरे, रोस्टन चेझ, अलझरी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वॉल्श जूनियर.