आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपच्या (Women's T20 World Cup) 10 व्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघ आमने-सामने येत आहे. ऑस्ट्रेलियाने आजवर या विश्वचषकमध्ये 2 सामने खेळले ज्यापैकी एकात विजय आणि एकात पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना भारताशी (India) झाला ज्यांनी आश्चर्यकारक कामगिरी करत विजय मिळवला. पण, पहिल्या सामन्यातील पराभवाला त्यांनी स्वतःवर हावी होऊ दिले नाही आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकाविरुद्ध जोरदार पुनरागमन कर्णधार मेग लेनिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर विजय निश्चित केला. ग्रुप अ मधील हे दोन्ही आजच्या सामन्यात विजय मिळवू पाहिलं. ऑस्ट्रेलियाने एका विजयासह 2 गन मिळवले आहे, तर श्रीलंकाने अजून आपले खाते उघडले नाही. या गटात ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि श्रीलंकाने एका सामन्यात पराभवासह अंतिम स्थान मिळवले आहे. (Women's T20 World Cup 2020: टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल फेरीत, न्यूझीलंडला 4 धावांनी पराभूत करून केली पूर्ण विजयाची हॅटट्रिक)
भारत-न्यूझीलंड महिला टी-20 विश्वचषक सामना गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता होईल. टॉस सकाळी 1.00 वाजता होईल. हा सामना कॅनबेराच्या मनुका ओव्हलवर खेळला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शनवर पाहिले जाऊ शकते. या सामन्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग भारतात हॉटस्टारवर पहिले जाऊ शकते.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी त्यांना बांग्लादेशविरुद्ध विजयाचा सर्वात मोठा दावेदार बनवते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया सारख्या प्रबळ टीमविरुद्ध जिंकण्यासाठी बांग्लादेशला सर्वतोपरीने प्रयत्न करावा लागेल. त्यांची फलंदाजी कमजोर असली तरी त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी प्रभावित केले.
असे आहे ऑस्ट्रेलिया-बांग्लादेश महिला संघ
ऑस्ट्रेलिया: एरिन बर्न्स, निकोला केरी, एशले गार्डनर,राचेल हेन्स (उपकर्णधार), एलिसा हीली (विकेटकीपर), जेस जोनासेन, डेलिसा किमिन्स, मेग लॅनिंग (कॅप्टन), सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिसे पेरी,मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, टेयला व्लेमिंक, जॉर्जिया व्हेरहॅम.
बांग्लादेश: शमीमा सुलताना (विकेटकीपर), मुर्शिदा खातून, संजीदा इस्लाम, निगार सुलताना, फरगाना हुक, रुमाना अहमद, पन्ना घोष, सलमा खातून (कॅप्टन), जहाँआरा आलम, फहिमा खातुन, नाहिदा एक्टर, रितु मोनी, आयशा रहमान, शोभना मोस्टरी, खदीजा तुल कुबरा