Close
Advertisement
 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

IND vs NZ 2nd Test Day 3 Highlights: न्यूझीलंडने 7 विकेटने जिंकली दुसरी कसोटी, भारताचा सलग दुसऱ्यांदा केला क्लीन स्वीप

क्रिकेट टीम लेटेस्टली | Mar 02, 2020 08:19 AM IST
A+
A-
02 Mar, 08:19 (IST)

भारत आणि यजमान न्यूझीलंड संघातील क्राइस्टचर्च स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी किवी टीमने 7 विकेटने भारताचा परभाव केला आणि मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टॉम लाथम आणि टॉम ब्लंडेलने अर्धशतकी कामगिरी केली.  भारताने दिलेल्या 132 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 3 विकेट गमावल्या. जसप्रीत बुमराहने 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला. न्यूझीलंड दौऱ्यावरील भारताचा हा सलग दुसरा क्लीन स्वीप ठरला. यापूर्वी वनडे मालिकेत न्यूझीलंडने भारताविरुद्ध 3-0 असा विजय मिळवला होता. 

02 Mar, 08:08 (IST)

जसप्रीत बुमराहने टॉम ब्लंडेलला 32.5 ओव्हरमध्ये बोल्ड केले. यासह न्यूझीलंडने तिसरी विकेट गमावली. ब्लंडेलने 113 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 55 धावांचा अर्धशतकी डाव खेळला. 33 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 121/3.

02 Mar, 07:38 (IST)

पहिल्या डावात 52 धावांचे अर्धशतक झळकावणार्‍या टॉम लाथमने दुसऱ्या डावातही शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 26.1 षटकांत चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले, पण 28 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर उमेश यादवने त्याला विकेटच्या मागे रिषभ पंतकडे झेलबाद केले. लाथम 52 धावा करून माघारी परतला. न्यूझीलंडने 1 विकेट गमावून 100 धावा पूर्ण केल्या. 

02 Mar, 07:10 (IST)

दुसऱ्या डावात भारताने दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडला विजयासाठी 50 धावांची गरज आहे. 21 ओव्हरनंतर न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता 82 धावा केल्या. टॉम लाथम 42 आणि टॉम ब्लंडेल 32 धावा करून खेळत आहे. 

02 Mar, 06:05 (IST)

हेगले ओव्हलमध्ये यजमान न्यूझीलंड आणि भारतमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाची घोषणा झाली आहे.दुपारच्या जेवणापर्यंत न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता 46 धावा केल्या आहेत. टीमकडून टॉम लाथम 16 आणि टॉम ब्लंडेल 23 धावा करून खेळत आहेत. दिवसाच्या सुरुवातीला भारताचा दुसरा डाव 124 धावांवर संपुष्टात आला. 

02 Mar, 05:47 (IST)

दुसर्‍या डावात भारताने दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्यत्तरात किवी संघाने 10 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 31 धावा केल्या आहेत. टॉम लाथम 15 आणि टॉम ब्लंडेल 10 धावा करून खेळत आहेत.

02 Mar, 05:38 (IST)

दुसर्‍या डावात फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता 15 धावा केल्या आहेत. संघासाठी टॉम ब्लंडेल 14 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 9 आणि टॉम लाथम एका चौकारांच्या मदतीने 16 चेंडूत 6 धावा करून खेळत आहे. 

02 Mar, 05:20 (IST)

भारताने दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली आहे. 5 ओव्हर नंतर टॉम लाथम 6 आणि टॉम ब्लंडेल 9 धावा करून खेळत आहेत. 

02 Mar, 04:51 (IST)

न्यूझीलंडविरुद्ध हेगले ओव्हल मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या डावात यजमान संघाला 132 धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला पहिल्या डावात 235 धावांवर ऑलआऊट केल्यावर भारताच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले. पहिल्या डावात यजमान टीमविरुद्ध 7 धावांची आघाडी घेतल्यावर भारत दुसऱ्या डावात 124 धावांवर ऑलआऊट झाला. 

02 Mar, 04:41 (IST)

टीम इंडियाचा दुसरा डाव लवकरच संपणार आहे. दुसऱ्या डावातही भारताने किवी गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाही भारताने एकापाठोपाठ एक विकेट गमावली. विहारी, पंतनंतर साऊथीने मोहम्मद शमीलाही माघारी धाडले. भारताने आता त्यांची नववी विकेट गमावली. 

Load More

हेग्ले ओव्हलमध्ये भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) दरम्यान सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाची टंकती तलवार आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या तुफानी गोलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडला रविवारी येथे झालेल्या दुसर्‍या क्रिकेट कसोटीच्या दुसर्‍या दिवशी पहिल्या डावात 235 धावांवर गुंडाळले, पण भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात पुन्हा एकदा निराश केले. पहिल्या डावाच्या आधारे सात धावांची आघाडी घेतलेल्या भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसर्‍या डावात 90 धावांत सहा विकेट गमावल्या. भारताची एकूण आघाडी 97 धावांची आहे. दिवसाचा खेळ संपल्यानंतर हनुमा विहारी (Hanuma Vihari) पाच धावा तर रिषभ पंत (Rishabh Pant) एक धाव करून खेळत होता. आता तिसऱ्या दिवशी भारताला आता पराभव टाळण्यासाठी मोठी आघाडी वाढवण्याची गरज आहे.

दुसर्‍या डावात ट्रेंट बोल्टने (Trent Boult) भारतीय फलंदाजांना सतत अडचणीत आणले. टिम साऊथी, नील वॅग्नर आणि कॉलिन डी ग्रैंडहोमने त्याला चांगली साथ दिली. दुसर्‍या दिवशी हेगले ओव्हलच्या गोलंदाजांनी 262 धावांवर 16 गडी बाद केले. न्यूझीलंडने सर्व 10 गमावले तर भारताने 6 गडी गमावले. यापूर्वी शमी, बुमराह आणि रवींद्र जडेजाच्या धारदार गोलंदाजीसमोर न्यूझीलंड संघ पहिल्या डावात 235 धावांवर ऑलआऊट झाला. संघासाठी सलामीवीर टॉम लाथमने सर्वाधिक 52 धावा केल्या तर काईल जैमीसनने 49 धावा केल्या. भारताने न्यूझीलंडची स्थिती 177 धावांवर आठ विकेट अशी केली होती, मात्र अंतर वॅग्नर आणि जैमीसनने नवव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली आणि भारताच्या मोठी आघाडी घेण्याच्या हेतूवर पाणी फिरवले. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


Show Full Article Share Now