आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. सेमीफायनलमध्ये 18 पराभूत झाल्याने भारतीय चाहते आणि संघाचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. आता न्यूझीलंड संघ फायनलमध्ये यजमान इंग्लंड (England) संघाशी भिडणार. दोन्ही संघानी याआधी एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. दरम्यान, विश्वचषक मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता घरी परतला आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आपली पत्नी रितिका सजदेह (Ritik Sajdeh) आणि मुलगी समायरा (Samaira) सोबत मुंबई (Mumbai) एअरपोर्टवर दिसला. (ENG vs NZ World Cup 2019 Final मॅचमध्ये जो रूट, केन विलियमसन यांना रोहित शर्मा याला मागे टाकण्याची संधी)
रोहित पत्नी रितिका आणि लेक समायरा सोबत एअरपोर्ट बाहेर येतानाच एक विडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या फोटो आणि व्हिडिओवर चाहते रोहितला प्रोत्साहन देत आहेत आणि त्याचे कौतुक करत आहेत. यंदाच्या विश्वचषकमध्ये रोहितने 648 धावा केल्या आहेत आणि सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रोहित अव्वल क्रमांकावर आहे.
We failed to deliver as a team when it mattered, 30 minutes of poor cricket yesterday & that snatched away our chance for the cup. My heart is heavy as I’m sure yours is too.The support away from home was incredible.Thank you all for painting most of uk blue wherever we played 🇮🇳
— Rohit Sharma (@ImRo45) July 11, 2019
दरम्यान, विश्वचषकमधील पराभवानंतर रोहितने ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं. एक भावनात्मक ट्विट करत रोहित म्हणाला, "जेव्हा चांगली खेळण्याची गरज होती, तेव्हा आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. 30 मिनिटांच्या आमच्या खराब खेळीमुळं आम्हाला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. माझे अंतकरण जड झालेआहे, खात्री आहे मला तुम्हालाही तसेच वाटत असेल. तरी, घरापासून लांब खेळत असतानाही चाहत्यांनी आम्हाला समर्थन केले. इंग्लंडमध्ये आम्हाला निळा रंग जास्त दिसत होता."