KXIP vs KKR, IPL 2020: दिनेश कार्तिकने जिंकला टॉस, केकेआर करणार पहिले फलंदाजी
किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

KXIP vs KKR, IPL 2020: आयपीएलच्या (IPL) 24व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर (Kings XI Punjab) कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) खडतर आव्हान असेल. दरम्यान आजच्या सामन्यात नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. किंग्स इलेव्हन आजच्या सामन्यातून विजय पथावर परतण्याचा प्रयत्न करतील तर नाईट रायडर्स आपला विजयपथ कायम ठेवू पाहतील. आजच्या सामन्यासाठी किंग्स इलेव्हनने एक बदल केला असून क्रिस जॉर्डनला (Chris Jordan) प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले आहे. केकेआरने प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रसिध्द कृष्णाला (Prasidh Krishna) शिवम मावीच्या जागी संधी दिली आहे. किंग्स इलेव्हनसमोर यंदाच्या आयपीएलमध्ये आपले आव्हान टिकवून ठेवण्याचा दबाव असेल. टीमने 6 पैकी 5 सामन्यात पराभव पत्करला आहे, तर केकेआरने 5 पाकी 3 सामने जिंकले असून 2 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. अशास्थितीत केकेआर आयपीएल गुणतालिकेत चौथ्या आणि किंग्स इलेव्हन पॉईंट्स टेबलेच्या तळाशी आहेत. (KXIP vs KKR, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

काही सामन्यांमध्ये खराब कामगिरीनंतर केकेआर विजेतेपदाच्या प्रमुख स्पर्धकांमध्ये सामील झाला आहे, त्यांचे बहुतेक खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. सलामी फलंदाज म्हणून शुभमन गिल प्रभाव पाडत आहे, तर राहुल त्रिपाठीही आत्मविश्वासने भरलेला असेल. नितीश राणानेही प्रभाव पाडला आहे. मात्र, आंद्रे रसेलला अद्याप आपला जुना फॉर्म दाखविला नाही ज्यासाठी तो ओळखला जातो. दुसरीकडे, आजच्या सामन्यात देखील पंजाबकडून क्रिस गेलला खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी दोन फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी बजावली. कर्णधार राहुलने या हंगामात सर्वाधिक 313 धाव केल्या असून तो सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या 5 मध्ये मयंक अग्रवालचा देखील समावेश आहे.

पाहा केकेआर आणि किंग्स इलेव्हनचे प्लेइंग इलेव्हन

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, , मनदीप सिंह, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, सिमरन सिंह, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुजीब-उर-रहमान, मोहम्मद शमी आणि क्रिस जॉर्डन.

कोलकाता नाईट रायडर्स: राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितीश राणा, सुनील नारायण, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कॅप्टन आणि विकेटकीपर), पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, प्रसिध्द कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.