KXIP vs KKR, IPL 2020 Live Streaming: आयपीएलमधील (IPL) तिसऱ्या डबल-हेडर सामन्यासाठी चाहते सज्ज झाले आहे. यातील पहिल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबसमोर (Kings XI Punjab) आज कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) आव्हान असेल. एकीकडे मागील सामन्यात किंग्स इलेव्हनला सनरायझर्सविरुद्ध 69 धावांनी पराभव पत्करावा लागला, तर दुसरीकडे केकेआरने (KKR) चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी प्रभाव केला. किंग्स इलेव्हन आणि केकेआरचा सामना अबू धाबी येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.
आयपीएलमध्ये दोन्ही टीमच्या आजवरच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर कोलकाता पॉईंट टेबलमध्ये 3 विजय, 2 पराभव आणि 6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे, पण पंजाबची स्थिती अजून खराब आहे व ते 1 विजयासह गुणतालिकेत अंतिम स्थानावर आहेत. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात संघ स्थिर नाही परंतु मागील सामन्याच्या कामगिरीनेही या समस्येवर मात केल्याचे दिसत आहे. सलामी फलंदाजीतील बदल, गोलंदाजांच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरीमुळे संघ विजयी मार्गावर परत आला आहे. दुसरीकडे, किंग्स इलेव्हनला त्यांच्या अडचणींवर तोडगा काढावा लागेल. स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पंजाबला आपल्या रणनीतीत बदल करण्याची गरज आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये पंजाबची गोलंदाजी बरीच सामान्य राहिली होती, शिवाय फलंदाजीत केएल राहुल, मयंक अग्रवाल काही खास कामगिरी करू शकले नाही. ख्रिस गेलसारख्या फलंदाजाला अद्याप या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
पाहा केकेआर आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघ:
कोलकाता नाईट रायडर्स संघ: दिनेश कार्तिक (कॅप्टन/विकेटकीपर), शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बंटन, राहुल त्रिपाठी, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाईक, अली खान, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी.
किंग्स इलेव्हन पंजाब संघ: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, शेल्डन कॉटरल, क्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशम, निकोलस पूरन, ईशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णाप्पा गौथम, हरप्रीत ब्रार, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, सिमरन सिंह (विकेटकीपर), जगदीशा सुचित, ताजिंदर सिंह, हार्डस विल्जॉईन