किंग्स इलेवन पंजाब (File Photo)

किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) ने कैरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) संघ सेंट लुसिया झुक्स (St Lucia Zouks) विकत घेतला असल्याचे सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले. पंजाबची मालकी असलेल्या केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड यांनी सीपीएल फ्रँचायझीची खरेदी करणार आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) संघ लागल्यानंतरचा हा दुसरी आयपीएल फ्रँचायझी ठरली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने ट्रिनबागो नाइट रायडर्सची (Trinbago Knight Riders) फ्रॅन्चायसी विकत घेतले. 2013 मध्ये सुरू झालेली कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) ही जगातील स्थापित आणि प्रसिद्ध टी-20 लीगपैकी एक आहे. पंजाबचे सह-मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांनी पीटीआयला सांगितले की, “आम्ही कॅरिबियन प्रीमियर लीगचा भाग होण्यासाठी करारावर स्वाक्षरी करणार आहोत. आम्ही सेंट लुसिया फ्रँचायझी खरेदी करीत आहोत. बीसीसीआयची मंजुरी मिळाल्यानंतरच कंपनीच्या संरचनेची व नावाची माहिती दिली जाईल."

“मोहित बर्मन (सहकारी मालक) या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सध्या कॅरिबियनमध्ये आहे. हे शक्य केल्याबद्दल आम्ही सेंट लुसियाचे पंतप्रधान एलेन चेस्टरनेटचे विशेषतः आभार मानू इच्छितो. आम्ही जवळपास नऊ महिन्यांपासून याचा पाठपुरावा करीत आहोत, ” वाडिया पुढे म्हणाले.

सेंट लुसिया आयपीएल मालकाच्या हक्क असणारी दुसरी फ्रँचायझी ठरली आहे. या संघाचे नेतृत्व वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी करत आहे. या टीमने 2016 मध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी केली जेव्हा त्यांनी चौथे स्थान मिळवले. कोलकाता नाइट रायडर्स या आयपीएलच्या आणखी एका संघाने 2015 मध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स विकत घेतले. ही सीपीएलची आतापर्यंतची सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे आणि त्यांनी तीन वेळा विजेतेपद जिंकले आहे. 2020 सीपीएल (CPL) 19 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी मालक विजय मल्ल्या ने गेल्या वर्षी सीपीएल टीम बार्बाडोस ट्रायडंटची मालकी गमावली होती.