कोलकाता नाईट रायडर्स जॅक कॅलिस आणि सायमन कॅटिच यांना डच्चू, प्रशिक्षक पदांवरून हकालपट्टी
जॅक कॅलिस आणि सायमन कॅटिच (Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) मधील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने आपल्या आगामी सीजनसाठी आपल्या व्यवस्थापनात मोठे बदल केले आहेत. मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिस (Jacque Kallis) आणि सहायक प्रशिक्षक सायमन कॅटीच (Simon Katich) यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आल्याचे केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर (Venky Mysore) यांनी दिली. सोबत कर्णधार दिवेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या भविष्याबाबतही संघ काही दिवसांत निर्णय घेणार असल्याचे समजते. मागील सीजनमध्ये कार्तिक चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला देखील बाहेरचा रास्ता दाखवण्याच्या तयारीत आहे.

कॅलिस हे 2011 पासून केकेआर संघासोबत आहे. कॅलिस हे सुरुवातीला केकेआरसाठी खेळाडू म्हणून मैदानात उतरले होते. त्यानंतर खेळातून निवृत्ती घेतल्याने ते नंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले. 2015 मध्ये कॅलिस यांना कोलकात्याच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमण्यात आले होते. पण आता कॅलिसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय केकेआरने घेतला आहे.

कॅलिसनंतर आता त्यांच्या जागी कोणाला कोलकात्याचे प्रशिक्षकपद मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.