KKR (Photo Credit- X)

KKR vs RR IPL 2025 53rd Match: आयपीएल 2025 चा 53वा (IPL 2025) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात केकेआरने 1 धावेने रोमांचक विजय मिळवला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत राजस्थानसमोर 20 षटकात 207 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानला 20 षटकांत 5 गडी गमावून फक्त 208 धावा करता आल्या.

आंद्रे रसेलची 55 धावांची स्फोटक खेळी

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने 55 धावांची स्फोटक खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 25 चेंडूत चार चौकार आणि सहा षटकार मारले. आंद्रे रसेल व्यतिरिक्त, अंगकृष रघुवंशीने 44 धावांची शानदार खेळी केली. दुसरीकडे, राजस्थान राॅयल्सकडून युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, एम थेक्षाना आणि रियान परागने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.

रियान परागची 95 धावांची खेळी व्यर्थ

207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला एका धावेने पराभव पत्करावा लागला आणि 8 विकेट्स गमावल्यानंतर त्यांना फक्त 205 धावाच करता आल्या. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार रियान परागने 45 चेंडूत 95 धावा केल्या. यशस्वी जयस्वालने 34 धावा आणि शिमरॉन हेटमायरने 29 धावांचे योगदान दिले. तर शुभम दुबेने अखेर 14 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळी केली. पण तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला. कोलकाताकडून मोईन अली, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.