KKR

KKR Stats In IPL Final: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) पहिला क्वालिफायर-1 सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 26 मे रोजी आयपीएलचा विजेतेपदाचा सामना खेळवला जाणार आहे. अंतिम सामना जिंकून केकेआर संघाला तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवायचे आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. दरम्यान, अंतिम सामन्यांमध्ये केकेआरच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. (हे देखील वाचा: RR vs SRH Qualifier 2: पावसामुळे क्वालिफायर 2 रद्द झाला तर अंतिम फेरीत कोणता संघ खेळेल, इथे समजून घ्या समीकरण)

2012 मध्ये केकेआरने मिळवले पहिले विजेतेपद

कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2012 मध्ये प्रथमच फायनलमध्ये स्थान मिळवले होते. अंतिम सामन्यात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. त्या सामन्यात, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 190/3 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने मनविंदर बिस्ला (89) आणि जॅक कॅलिस (69) यांच्या खेळीच्या जोरावर लक्ष्य गाठले.

2014 मध्ये केकेआरने मिळवले दुसरे विजेतेपद

आयपीएल 2014 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पंजाब किंग्ज (तत्कालीन किंग्ज इलेव्हन पंजाब) यांच्याशी झाला होता. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने मनीष पांडेच्या 50 चेंडूत 94 धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर 19.3 षटकांत लक्ष्य गाठले. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सचे हे दुसरे आयपीएल विजेतेपद आहे.

2021 च्या फायनलमध्ये केकेआरला सीएसकेकडून पत्कारावा लागला पराभव

इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स संघ आयपीएल 2021 मध्ये उपविजेता ठरला होता. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला चेन्नई सुपर किंग्जचा अडथळा पार करता आला नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम खेळताना निर्धारित 20 षटकांत तीन गडी गमावून 192 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघ संपूर्ण षटके खेळून नऊ विकेट गमावून केवळ 165 धावा करू शकला आणि सामना 27 धावांनी गमावला.

कोलकाता नाईट रायडर्सला तिसरे विजेतेपद मिळवायचे आहे

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. लीग टप्प्यात, कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या 14 पैकी 9 सामने जिंकले आणि 3 गमावले. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सचे 2 सामनेही पावसामुळे वाया गेले. लीग टप्पा संपल्यानंतर, कोलकाता नाइट रायडर्स 20 गुणांसह (+1.428) गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत तिसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.