RR vs SRH Qualifier 2: पावसामुळे क्वालिफायर 2 रद्द झाला तर अंतिम फेरीत कोणता संघ खेळेल, इथे समजून घ्या समीकरण
IPL SRH vs RR (Pic Credit - Twitter)

RR vs SRH Qualifier 2: इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs SRH) यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 4 गडी राखून शानदार विजय नोंदवला. अशा प्रकारे रॉयल्सने क्वालिफायर 2 मध्ये स्थान मिळवले आहे. आता राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना उद्या म्हणजेच 24 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल?

क्वालिफायर 2 पावसामुळे रद्द झाला तर?

शुक्रवारी चेन्नईतील हवामान स्वच्छ आहे, त्यामुळे तेथे पावसाची शक्यता फारच कमी आहे. पण जर सामन्यात पाऊस पडला आणि सामना 5-5 षटकांचाही खेळता आला नाही तर सामना रद्द होईल. असे झाल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद संघ अंतिम फेरीत पोहोचेल जिथे त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. नेट रनरेटमध्ये सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्सपेक्षा पुढे आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा वरचष्मा

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आयपीएलच्या इतिहासात एकूण 19 वेळा आमनेसामने आले आहेत. यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाचा वरचष्मा दिसत आहे. सनरायझर्स हैदराबादने 10 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सने केवळ 9 सामने जिंकले आहेत. आता शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात कोणता संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरतो हे पाहायचे आहे. (हे देखील वाचा: SRH vs RR Pitch Report: चेन्नईमध्ये कोणाचे असणार वर्चस्व, फलंदाज कि गोलंदांज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, रोवमन पॉवेल.

सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.