KKR vs SRH, IPL 2020: हैदराबादने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, टीममध्ये झाले 'हे' मोठे बदल
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स (Photo Credit: File Image)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात असलेले सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आज अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये आमने-सामने येतील. आजच्या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा केलेले केकेआर (KKR) आणि एसआरएच (SRH) दोघेही आज विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. दोन्ही टीमची ताकद त्यांची फलंदाजी आहे आणि त्यांना त्यांच्या गोलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दोन्ही टीम गुणतालिकेत तळाशी आहेत. शिवाय, दोन्ही टीमला आपली मधलीफाळी देखील मजबूत करण्याची गरज आहे. (KKR vs SRH, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर)

आजच्या सामन्यासाठी सनरायझर्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहे. मागील सामन्यात दुखापत झालेल्या मिशेल मार्शच्या जागी सनरायझर्सने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी,  विजय शंकरच्या जागी रिद्धिमान साहा आणि संदीप शर्माच्या जागी खलील अहमदची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली आहे. वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोची जोडी पुन्हा एकदा डावाची सुरुवात करतील. वॉर्नर मागील सामन्यात दुर्दैवीपणे बाद झाला त्यामुळे आजच्या सामन्यात तो मोठा डाव खेळण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, कोलकाताकडून सुनील नारायण, शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. कोलकाताने देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नगरकोटी आज केकेआरकडून पहिला आयपीएल सामना खेळतील.

पाहा हैदराबाद आणि कोलकाताचा प्लेइंग इलेव्हन:

सनरायझर्स हैदराबाद इलेव्हनः जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), डेविड वॉर्नर (कॅप्टन), मनीष पांडे, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, मोहम्मद नबी, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, टी नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्स इलेव्हनः दिनेश कार्तिक (कॅप्टन/विकेटकीपर), सुनील नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, कमलेश नगरकोटी, कुलदीप यादव आणि शिवम मावी.