KKR vs SRH, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स (Photo Credit: File Image)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आठव्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात टक्कर पाहायला मिळेल. हैदराबाद आणि कोलकाताने यापूर्वी आयपीएलच्या 13 हंगामात एक-एक सामने खेळले आहेत आणि दोन्ही संघांना पराभवाचा समान करावा लागला आहे. अशा स्थितीत आयपीएलमध्ये आपापल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या दोन्ही टीम आज आमने-सामने येतील. आयपीएलच्या (IPL) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख झायेद स्टेडियमवर आमने-सामने येतील. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. भारतात प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपण या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अ‍ॅपवर पाहू शकता. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: CSKचा पराभव करत DCने घेतली झेप, जाणून घ्या पॉईंट्स टेबलवर कोणता संघ कितव्या स्थानी)

दिनेश कार्तिक आणि डेविड वॉर्नर या दोघांच्याही संघांना स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.पहिल्या सामन्यात केकेआरचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला, तर हैदराबादविरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विजयी सुरुवात केली. अशा परिस्थितीत दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरतील. आजच्या सामन्यासाठी दोन्ही टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहे. गेल्या चार सामन्यांविषयी बोलायचे तर हैदराबाद आणि कोलकाताने प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत.

पाहा सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर संघ

सनरायझर्स हैदराबाद:  दिनेश कार्तिक (कॅप्टन), शिवम मावी, संदीप वारियर, कुलदीप यादव, इयन मॉर्गन, पॅट कमिन्स, सुनील नारायण, निखिल नाईक, मणिमरण सिद्धार्थ, आंद्रे रसेल, लोकी फर्ग्युसन, प्रसिद्धि कृष्णा, शुभमन गिल, नितीश राणा, सिद्धेश लाड, कमलेश नगरकोटी, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, टॉम बंटन, क्रिस ग्रीन, राहुल त्रिपाठी.

कोलकाता नाइट रायडर्स: डेविड वॉर्नर (कॅप्टन), केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, मोहम्मद नबी, प्रियम गर्ग, विजय शंकर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), विराट सिंह, भुवनेश्वर कुमार, बेसील थंपी, अभिषेक शर्मा, बिली स्टॅनलेक, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, जेसन होल्डर, बावनका संदीप, फॅबियन ऍलन, अब्दुल समद, संजय यादव आणि रशीद खान.